कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांची जत्रा... 55 वर्षांपासून कोळी बांधव जपतायत परंपरा

Kundlika Bay : अलिबाग तालुक्यातील आग्रावकरांनी इतर ठिकाणी बंद झालेली परंपरा 55 वर्षांपासून जपून ठेवली आहे. त्यामुळेच या पारंपारिक स्पर्धांना राजाश्रय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Mar 23, 2023, 18:20 PM IST

या स्पर्धेला पारंपारिक पर्यटनाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केली आहे. दरवर्षी गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे मोठ्या उत्साहात कोळी बांधव यामध्ये सहभागी होत आहेत.

1/6

Boat fair at Kundlika Bay

कुंडलिका खाडीत गुरुवारी होड्यांची जत्रा पाहायला मिळाली आहे. कुंडलिका खाडीमध्ये शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. गेल्या 50 ते 55 वर्षांपासून कोळी बांधवांकडून ही परंपरा जपली जात आहे.

2/6

kundalika bay boat

अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज जणू होड्यांची जत्राच भरली होती. निमित्त होतं शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचं. 

3/6

Kundlika Bay boat race

सध्या शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांकडून ही परंपरा जपली जात आहे.

4/6

raigad boat fair

कुंडलिका खाडीत गुरुवारी शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला आहे. यानिमित्ताने एकवीरा देवीच्या पालखीची होडीतून मिरवणूक काढण्यात आली होती.

5/6

koli dance

कोळी बांधव आपल्या होड्या रंगीबेरंगी पताकांनी सजवून सहकुटुंब खाडीतून फेरफटका मारत होते. यावेळी कोळी बांधवांनी पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत मनसोक्त आनंद घेतला आहे.  

6/6

boat race

दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. गुरुवारी ही स्पर्धा अनुभवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.