ममता बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना बांधली राखी, 'भारतरत्न' देण्याची मागणी; Exclusive फोटो

भावा-बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. आज देशभरात उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा होतोय. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी विरोधी पक्षातील दिग्गज नेते बैठकीत मुंबईत दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुंबईत दाखल होताच ममता बॅनर्जी यांनी थेट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला गाठत त्यांची भेट घेतली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Aug 30, 2023, 19:14 PM IST
1/7

रक्षाबंधनाच्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) मुंबईत दाखल झाल्या असून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ममता बॅनर्जी थेट महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरी पोहोचल्या.

2/7

मुंबईत दाखल होताच त्यांनी जलसावर जाऊन बच्चन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या या सगळ्यांची ममतांनी भेट घेऊन विचारपूस केली. 

3/7

ममता बॅनर्जी अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जलसा बंगल्यावर दाखल झाल्यानंतर जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन यांनी ममता बॅनर्जी यांचं स्वागत केलं. 

4/7

संपूर्ण बच्चन कुटुंब यावेळी पारंपारिक पोशाखात होते. ममता बॅनर्जी यांना पाहाताच ऐश्वर्या राय-बच्चन यांनी हसतमुखाने त्यांचं स्वागत केलं. तर आराध्या बच्चनने हात जोडून ममता बॅनर्जींची भेट घेतली.

5/7

अमिताभ बच्चन यांना भारतरत्न द्यायला हवं, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी यावेळी म्हटलंय. मी असते तर अमिताभना केव्हाच भारतरत्न दिलं असतं, असं त्या म्हणाल्या. 

6/7

तसंच कोलकाता फिल्म फेस्टिव्हलसाठी अमिताभ बच्चन यांना आमंत्रण देणार असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांना राखी बांधली, याचा मला आनंद आहे असं सांगत त्यांनी देशातल्या सर्व भावा-बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

7/7

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणाऱ्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूसिव अलायंसच्या बैठकीतसाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत.