Date करण्यासाठी कोणत्या राशीची व्यक्ती कोणत्या राशीच्या व्यक्तीसाठी अयोग्य? जाणून घ्या

Astrology News : आकर्षण आणि सहवास यातून अनेक नाती जोडली जातात. तासंतास कामानिमित्त किंवा कॉलेजमध्ये आपण एकमेकांसोबत राहतो, एखादी व्यक्ती आपल्याला आवडते. मग विचार केला जातो त्या व्यक्तीसोबत Dating ला जाण्याचा. पण Dating साठी योग्य व्यक्ती कोण कसं समजणार?

May 12, 2023, 13:51 PM IST

Relationships Tips : आजही अनेक जण आहेत जे ज्योतिषशास्त्रा, अंकशास्त्रावर या गोष्टींचा दैनदिन जीवनात उपयोग करतात. त्यावर विश्वास ठेवून अनेक गोष्टी करतात. आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल यासाठी राशीभविष्य मोठ्या प्रमाणात वाचलं जातं. खरं तर ज्योतिषशास्त्रात हे आपल्या आयुष्याला दिशा देण्याचं काम करतं. कुंडली पाहून जोडीदाराची निवड केली जाते. पण लव्ह मॅरेज असेल तर कुंडलीचा प्रश्न येतं नाही. (Astrology in marathi)

1/13

कुठली राशीची लोक आपल्यासाठी योग्य नाही?

जेव्हा आपण कोणाला डेटवर घेऊन जायचा विचार करतो. तेव्हा फक्त आकर्षणातून त्याची सुरुवात होते. हीच डेट आणि तुमचं नातं (Relationships) अजून छान व्हावी यासाठी वैदिक ज्योतिषशास्त्रात कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणासोबत डेटवर जायला नको हे सांगितलं आहे.   

2/13

मेष (Aries)

या राशीचे लोक हे उत्कट आणि धाडसीवृत्तीचे असतात. ही लोक बिलकुल रोमँटिक नसतात. त्यामुळे या लोकांनी कन्या आणि वृश्चिक राशीच्या कोणाशी डेट करु नयेत.

3/13

वृषभ (Taurus)

या राशीची लोक अतिशय समजूतदार असतात. त्यांना स्वतःची स्पेस एन्जॉय करायला जास्त आवडतं. त्यामुळे त्यांनी प्रेमळ अशा तुळ आणि धनु राशीसोबत कधीही डेट करु नयेत. 

4/13

मिथुन(Gemini)

या राशीची लोक ही स्मार्ट, व्हर्सेटाईल आणि प्रेमळ व्यक्तिमत्वाली असतात. त्यामुळे त्यांनी स्टाँग आणि वर्चस्व गाजवणाऱ्या वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांशी कधीही डेट करु नयेत.

5/13

कर्क (Cancer)

या राशीचे लोक अतिशय भावनिक असतात. सहानुभूतीशील हा त्यांचा पिक पाईंट असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसोबत नातेसंबंधात ठेवू नयेत.   

6/13

सिंह (Leo)

ही रास हिचा नावासारखी तापट असते. त्याची आक्रमक वृत्तीमुळे त्या इतरांपेक्षा वेगळी ओळखली जाते. या व्यक्तीने अतिसंवेदनशील अशा मीन आणि मकर राशीच्या लोकांसोबत नातं ठेवू नयेत. 

7/13

कन्या(Virgo)

या राशीची लोक अतिशय निष्ठावान असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी कधीही कुंभ आणि मेष राशीच्या लोकांशी रिलेशनशीप ठेवू नयेत. 

8/13

तूळ (Libra)

या राशीची लोक रोमँटिक असतात. मीन राशीची लोक अत्यंत संवेदनशील असतात तर वृषभ राशीच प्रामाणिक असतात. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी कधीही मीन, वृषभ राशीसोबत प्रेमात पडू नयेत.

9/13

वृश्चिक (Scorpio)

या राशीची लोक शक्तीशाली आणि प्रेरणादायी असतात. त्यांनी मेष आणि मिथुन राशीच्या लोकांच्या नांदी लागू नयेत. 

10/13

धनु (Sagittarius)

या राशीचे लोक उत्साही आणि उदार असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी कधीही वृषभ आणि कर्क राशीच्या प्रेमात पडू नये. 

11/13

मकर (Capricorn)

या राशीची लोक अतिशय शिस्तप्रिय आणि धैर्यवान असतात. त्यामुळे या लोकांचं मिथुन आणि सिंह या राशीही कधी जुळू शकतं नाही.   

12/13

कुंभ (Aquarius)

या राशीची लोक माणुसकीसाठी ओळखली जातात. या राशीच्या लोकांचं कर्क आणि कन्या राशीच्या लोकांशी कधीही पटू शकत नाही. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी कर्क आणि कन्या राशीसोबत डेटवर जाऊ नये. 

13/13

मीन (Pisces)

या राशीचे लोक सहानुभूतीशील आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्वाची असतात. सिंह आणि तूळ या राशीच्या लोकांनी कधीही जमत नाही. या दोन राशींसोबत मीन राशीचं कधीही हेल्दी रिलेशनशीप होऊ शकत नाही. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)