IPL 2023 : दुखापतीमुळे 'हे' खेळाडू यंदाच्या आयपीएलमधून बाहेर; पाहा लिस्ट!

IPL 2023 Ruled Out Player List: आयपीएलला आजपासून सुरुवात होणार आहे. मात्र काही असे महत्त्वाचे खेळाडू आहेत, जे यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाहीयेत. जाणून घेऊया हे खेळाडू कोण?

Mar 31, 2023, 19:17 PM IST
1/5

Rishabh Pant

दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतचा मोठा अपघात झाला. ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीये. त्याला रिकव्हर होण्यास वेळ लागणार असल्याने यंदाच्या आयपीएलमधून तो बाहेर गेला आहे. 

2/5

Mukesh Choudhary

चेन्नई सुपर किंग्ज कायली जॅमिनसन आणि मुकेश चौधरी यंदाच्या आयपीलएमध्ये खेळणार नाही. दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू चेन्नई सुपर किंग्जमधून बाहेर आहेत. 

3/5

Jonny Bairstow

पंजाब किंग्स इंग्लंडचा स्टार आणि अनुभवी बॅट्समन जॉनी बेयरस्टो बाहेर गेला आहे. पंजाब किंग्स टीमचा तो भाग होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पायाला दुखापत झाली असून तो त्यातून सावरलेला नाही.

4/5

Jasprit Bumrah

मुंबई इंडियन्स मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएलच्या 16 व्या मोसमात खेळू शकणार नाहीये.

5/5

Shreyas Iyer

कोलकाता नाईट रायडर्स, श्रेयस अय्यर श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे या आयपीएलमधून अय्यर देखील बाहेर पडला आहे.