ऋषी कपूर - नीतू; बॉलीवूडची रोमॅन्टिक जोडी
बॉलिवूडमधील सर्वात रोमॅन्टिक कपलमध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर (सिंह) या जोडीची नेहमीच चर्चा असते. पण या दोघांची पहिली ओळख तितकीशी रोमॅन्टिक झाली नव्हती.
नीतू कपूर यांनी एका मुलाखतीदरम्यान त्याकाळातील काही आठवणी शेअर करताना आपल्या लव्हस्टोरीचा किस्साही सांगितला होता.
1/5
2/5
'ऋषी कपूर यांच्या सोबतची माझी पहिली भेट अतिशय चांगली नव्हती. ते प्रत्येकाची चेष्ठा, गंमत करायचे. ज्यावेळी मी मेकअप आणि चित्रपटासाठीची वेशभूषा करुन सेटवर यायची त्यावेळी माझीदेखील ते मस्करी करायचे. मी त्यांच्या या वागण्यामुळे अतिशय नाराज व्हायची. सगळ्यांची टर उडवणारे ते मला बिघडलेले व्यक्ती वाटायचे आणि म्हणूनच मला त्यांचा राग यायचा', असं नीतू कपूर यांनी सांगितलं होतं.
4/5