Rohit Sharma चं शतक हुकलं पण 27 शतकांचा आकडा मात्र गाठला; जाणून घ्या काय आहे प्रकरण

IND vs SL : भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला वनडे (IND vs SL First ODI) सामना गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कमबॅक करत चांगली खेळी केली.

Jan 10, 2023, 20:00 PM IST
1/5

टीम इंडियाने पहिल्या वनडे सामन्यापासून चांगली सुरुवात केली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा या दोघांनीही टीमला चांगली सुरुवात करून दिली. यावेळी दोघांनीही शतकी भागीदारी केली. अशातच रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड त्याच्या नावे केला आहे. 

2/5

रोहित आणि गिल यांच्या ओपनिंग जोडीने श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. पहिल्या विकेटसाठी 143 रन्सची पार्टनरशीप करण्यात आली. दरम्यान रोहितने वनडेमध्ये ओपनर म्हणून 27 सावी शतकी भागिदारी केली.

3/5

यावेळी रोहितसोबत सलामी जोडीदार म्हणून अनेक खेळाडू बदलले. एकूण 4 ओपनर फलंदाजांसोबत रोहितने 27 वेळा शतकी भागीदारी केली आहे. या 4 जणांमध्ये शिखर धवन, केएल राहुल, अजिंक्य रहाणे आणि गिल यांचा समावेश आहे.

4/5

रोहितने शिखर धवनसोबत 18 वेळा 100 हून जास्तवेळा ओपनिंग पार्टनरशिप केली आहे. यानंतर के एल राहुलसोबत 5. रहाणेसोबत 3 आणि गिलसोबत एकदा शतकी भागिदारी केलीये.

5/5

रोहितने आजच्या सामन्यामध्ये 83 रन्सची खेळी केली. त्याने 67 रन्समध्ये 9 फोर आणि 3 सिक्स मारलेत.