गुलाबाच्या झाडाला फुलं येत नाहीत? 'हा' उपाय केल्यास संपूर्ण झाडं फुलांनी भरेल

How do I make my rose plants flower more : गुलाबला फुलांचा राजा म्हणतात. त्यासोबत गुलाब हे प्रेमाचं प्रतिक आहे. कोणाच्या गॅलरीत, खिडकीत किंवा मग गार्डनमध्ये आलं तर व्वा! गार्डन असं सुंदर दिसतं की आपण त्याकडे मधमाशीप्रमाणे खेचले जातो. मग आता जर आपल्या घरातील गुलाबाच्या झाडाला फूलं आलं नाही तर चिंता करू नका. फक्त एक केमिकल टाकल्यानं तुमच्या गुलाबाच्या झाडाला लगेच फुलं येऊ लागतील. 

| Dec 25, 2023, 09:00 AM IST
1/7

ऊन असेल तिथे लावा झाडं

गुलाबाचं झाडं जिथे लावणार तिथं ऊन येतं की नाही याची काळजी घ्या. तर मोकळ्या ठिकाणी गुलाबाची कुंडी ठेवा. झाडाला कमीत कमी 6 तास ऊन मिळायला हवं. 

2/7

पाणी किती आणि कधी घालावं?

जर तुम्ही गुलाबाचं झाडं लावलं आहे तर त्याला रोज नाही तर एक दिवस सोडून पाणी घाला. जेव्हा झाडं मोठं होतं तेव्हा आठवड्यातून एकदा पाणी घाला. त्यासोबतच कुंडीला ड्रेनेज होल आहे की नाही ते तपासा. 

3/7

झाडाला पोषण मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?

झाडाला योग्य प्रमाणात पोषण मिळावं यासाठी त्यात केळ्याच्या सालीची पेस्ट, अंड्याचं कवच, एप्सम सॉल्ट घालायला विसरू नका. 

4/7

केमिकल खत

तुम्ही सगळ्या गोष्टी कितीही प्रमाणात घातल्या तरी त्यासोबत केमिकल खत घालावं लागेल असं तुम्हाला वाटतं असेल. मात्र, त्याची आवश्यकता नाही.   

5/7

झाडाला फुलं येत नाही तर करा 'हा' उपाय

जर तुमच्या घरातील गुलाबाच्या झाडाला फुल येत नाही तर त्यात मोहरीचा केक वापरू शकता. ते तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल. सर्व प्रथम 3-4 दिवस पाण्यात भिजवून त्याला फुगवा.

6/7

कसा घालाल मोहरीचा केक?

दर तीन दिवसानं गुलाबाच्या झाडाच्या मुळांमध्ये मोहरीचा केक घाला. 15 दिवस सलग केल्यानंतर एक आठवड्यापर्यंत केल्यानंतर तो चुकूनही घालू नका. 

7/7

काय होतो फायदा?

हे केल्यानं नक्कीच तुमच्या गुलाबाच्या झाडाची वाढ होईल आणि फूलं देखील खूप येतील. (All Photo Credit : Freepik) (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)