सप्टेंबर महिना संपत आला, अजूनही तुम्ही 'ही' कामं केली नाहीत का? 1 ऑक्टोबरपासून होणार 5 मोठे बदल

New Rules From 1st October : एक ऑक्टोबरपासून पाच मोठे बदल होणार असून हे बदल थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावरबदल करणारे ठरणार आहेत. त्यामुळे ही बातमी प्रत्येक सर्वसामान्य माणसाठी महत्ताची आहे. तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही यातल्या गोष्टी पूर्ण केल्या नसतील तर आणखी चार दिवस शिल्लक आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत ही सर्व काम पूर्ण करा.

| Sep 26, 2023, 16:00 PM IST
1/7

प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला काही ना काही बदल होत असतात. येत्या 1 ऑक्टोबरपासून पाच महत्त्वाचे बदल होत आहेत. ज्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यावर थेट परिणाम होणार आहे. 

2/7

दोन हजाररुपयांच्या नोटा चलतनातून बाद होणार आहेत.  1 ऑक्टोबरनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे दोन हजाराची नोट असेल तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेतून बदलून घ्या. त्यानंतर 2000 हजाराची नोट चलनात वापरता येणार नाही. 

3/7

एलपीजी  (LPG) आणि तेल कंपन्यांकजून सीएनजी-पीएनजीच्या (CNG-PNG) किंमतीत बदल केला जातो. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एअर फ्यूलचे रेट (ATF) बदलले जातात. यावेळी देखील सीएजी-पीएनजीच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे.   

4/7

परदेश दौऱ्याचा प्लान करण्यांसाठी ही महत्त्वाची तारीख आहे. 1 ऑक्टोबरपासून परदेश दौरा महाग होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून 7 लाख रुपयांपर्यंतच्या टूर पॅकेजवर 5 टक्के टीसीएस द्यावा लागणार आहे. तर 7 लाखांवरच्या टूर पॅकेजवर 20 टक्के टीसीएस भरावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही परदेश दौऱ्याचा प्लान करत असाल तर आताच नीट प्लान करा.

5/7

30 सप्टेंबरपर्यंत पीपीएफ, पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम आणि सुकन्या समृध्दी सारक्या योजना आधारकार्डबरोबर लिंक करा. लिंक केलं नसेल तर 1 ऑक्टोबरपासून तुमचं खातं गोठवलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यातून कोणत्याही प्रकारचं ट्रान्झेक्शन करुन शकत नाही. त्यामुळे आताच घाई करा. 

6/7

ऑक्टोबर महिन्यात बँकांना तब्बल 16 दिवसांची सुट्टी आहे. याचा थेट परिणाम दैनंदिन बँकिंग कामांवर होणार आहे. त्यामुळे बँकेसंदर्भात महत्त्वाची कामं असतील तर या चार दिवसातच उरकून घ्या. आरबीआयच्या नियमानुसार अनेक शहरातील बँका बंद असणार आहेत.   

7/7

सप्टेंबर महिना संपायला आणखी चार दिवसांचा अवधी आहे. यातही महत्वाची कामं तुम्ही केली नसतील किंवा विसरला असाल तर आजच ती कामं पूर्ण करा.