भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर Lunar Lander उतरवण्याचा रशियाचा प्लान; रॉकेट लाँचिंगसाठी रिकामं केले गाव
चांद्रयान- 3 आता 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान- 3 मोहिमकडे असतानाच आता रशियाने देखील चंद्र मोहिम हाती घेतली आहे.
Chandrayaan 3 Vs Russia Lunar Mission: ISRO ने चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला आहे. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेलं हे पहिलं यश आहे. चांद्रयान 3 ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही फोटो घेतली आहेत. 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर Lunar Lander उतरवण्याचा रशियाचा प्लान आहे. रॉकेट लाँचिंगसाठी रशियाती एक गाव रिकामं करण्यात आले आहे.