खंत कायमच...! पाहा किती शिकलाय आपला Sachin Tendulkar

Sachin Tendulkar Education: विक्रम रचण्यासाठीच जन्मला... तो सचिन. सचिनची ही अशी ओळख कोणालाही नवी नाही. विक्रमादित्य ते मास्टर ब्लास्टर अशी कैक नावं त्याला आताचपर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत देण्यात आली आहेत. 

Apr 24, 2023, 13:13 PM IST

Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकर. क्रिकेच जगतातील एक असं नाव, ज्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय दिवसागणिक आणखी मोठं होताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट जगतातील एक नवी पहाट म्हणजे सचिन, त्याच्या परी तोच... म्हणजे सचिन. 

1/7

सचिन कायमच खास...

sachin tendulkar 50 th birthday his school education details

असा हा सचिन सर्वांनाच आपल्यातलाच कुणीतरी खास वाटतो. म्हणूनच की काय, सचिनचा उल्लेखही बरेचजण हक्कानं, आपला सचिन! असा करतात. 

2/7

क्रिकेटचा देव

sachin tendulkar 50 th birthday his school education details

सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 ला राजापुरातील एका मराठमोळ्या कुटुंबात झाला. वडिलांनी संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून त्याला हे नाव दिलं. आणि हा पठ्ठ्या क्रिकेटचाच देव झाला.   

3/7

यशशिखरं

sachin tendulkar 50 th birthday his school education details

फार कमी वयातच सचिननं क्रिकेट जगतात पाऊल ठेवलं आणि टप्प्याटप्प्यानं तो यशशिखरं चढू लागला.   

4/7

आंतरराष्ट्रीय संघापर्यंत मजल

sachin tendulkar 50 th birthday his school education details

स्थानिक, क्लब, रणजी आणि मग थेट आंतरराष्ट्रीय संघापर्यंत मजल मारणारा सचिन भारतरत्नही ठरला.   

5/7

शारदाश्रम शाळा

sachin tendulkar 50 th birthday his school education details

मुंबईतील दादर येथे असणाऱ्या शारदाश्रम विद्यामंदिरात त्यानं शालेय शिक्षण घेतलं. क्रिकेटमध्ये त्यानं स्वत:ला इतकं झोकून दिलं होतं की शिक्षणाकडे काहीसं दुर्लक्ष झालं.   

6/7

सचिननं दहावीचं शिक्षण...

sachin tendulkar 50 th birthday his school education details

सचिननं दहावीचं शिक्षण पूर्ण केलं. असं म्हणतात तो बारावीही शिकला, पण त्यातही काही रंजक वळणं आहेत. 

7/7

खंत मनात कायम....

Sachin Tendulkar Education

आपण उच्च शिक्षण घेऊ शकलो नाही, याची खंत सचिनच्या मनात कायम राहिली. किंबहुना त्यानं ती बोलूनही दाखवली.