...अन् सचिनने परत केला 'तो' Blank Cheque; कारण वाचून वाटेल अभिमान

Sachin Tendulkar Returned Blank Cheque: सचिन तेंडुलकर आजही सोशल मीडियापासून ते मैदानापर्यंत आणि कॉमेन्ट्री बॉक्सपासून ते आयपीएल दरम्यान डगाऊटमध्ये दिसून येतो. काही दिवसांपूर्वीच तो मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झालेला. त्यानेच या कार्यक्रमात एक किस्सा सांगितला. हा किस्सा त्याने रिटर्न केलेल्या एका ब्लँक चेक संदर्भात होता. तो नेमका काय म्हणाला आणि कोणाकडून हा चेक आलेला पाहूयात...

| Jun 08, 2023, 16:34 PM IST
1/10

Sachin Tendulkar Never Done Alcohol or tobacco ad

सचिन तेंडुलकर... खरं तर या नावाची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. आजही कायम बातम्यांमध्ये असलेला मास्टर ब्लास्टर नुकताच मुंबईमधील एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. तिथे त्याने त्याच्या आयुष्यातील एक खास किस्सा सांगितला. तो नेमकं काय म्हणाला पाहूयात...

2/10

Sachin Tendulkar Never Done Alcohol or tobacco ad

सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतरही अनेक वर्षांपासून देशातील सर्वात जास्त ब्रॅण्ड व्हॅल्यू असलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. आजही सचिनची कमाई कोट्यवधींमध्ये आहे.

3/10

Sachin Tendulkar Never Done Alcohol or tobacco ad

सचिन तेंडुलकरने एकदा एका जाहिरात कंपनीने दिलेला पूर्णपणे कोरा चेक मिळाला तसाच परत केला होता.

4/10

Sachin Tendulkar Never Done Alcohol or tobacco ad

सचिनने त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांना दिलेल्या एका आश्वासनामुळे हा चेक त्याने परत केला होता.

5/10

Sachin Tendulkar Never Done Alcohol or tobacco ad

सचिन ज्यावेळी शालेय शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडला होता. त्याने नुकतीच भारतीय क्रिकेट संघात खेळायला त्याने सुरुवात केली होती.

6/10

Sachin Tendulkar Never Done Alcohol or tobacco ad

सचिननी बॅट ज्याप्रमाणे मैदान गाजवत होती त्याप्रमाणे त्याला मोठमोठ्या जाहिरातींच्या ऑफर्स येऊ लागल्या.

7/10

Sachin Tendulkar Never Done Alcohol or tobacco ad

सचिनला ज्या कंपन्यांच्या जाहिरातींच्या ऑफर्स याययच्या त्यामध्ये अल्कोहोल आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या कंपन्यांचाही समावेश होता.

8/10

Sachin Tendulkar Never Done Alcohol or tobacco ad

मात्र सचिन तेंडुलकरने त्याचे वडील रमेश यांना एक शब्द दिलेला. कधीच अशा ब्रॅण्ड्सच्या (अल्कोहोल, तंबाखूजन्य पदार्थांच्या ब्रॅण्ड्सच्या) जाहिराती करु नकोस असा सल्ला सचिनला वडिलांना दिला होता. सचिननेही याला होकार दिलेला.

9/10

Sachin Tendulkar Never Done Alcohol or tobacco ad

याच एकमेव कारणामुळे सचिनने आजपर्यंत कधीही अल्कोहोल, तंबाखूजन्य पदार्थंच्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती केल्या नाहीत.

10/10

Sachin Tendulkar Never Done Alcohol or tobacco ad

मी माझ्या वडिलांना दिलेला हा शब्द कधीच मोडणार नाही, असंही सचिनने नुकत्याच मुंबईतील पार पडलेल्या महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ मुख अभियान कार्यक्रमात म्हटलं.