'मास्टर ब्लास्टर'च्या लेकिवर नेटकरी फिदा

Sep 29, 2020, 16:35 PM IST
1/6

'मास्टर ब्लास्टर'च्या लेकिवर नेटकरी फिदा

मास्टर ब्लास्टर म्हणून क्रिकेट विश्वात ख्याती असणाऱ्या सचिन तेंडुलकर यानं क्रिकेटला रामराम ठोकला असला तरीही त्याच्याप्रती असणारं प्रेम मात्र तसुभरही कमी झालेलं नाही. पण, त्याच्या या लोकप्रियतेत आता एक भागीदारही आली आहे. बरं, ही भागीदार तिची वेगळी ओळखही बनवू पाहत आहे. तिचं नाव आहे सारा तेंडुलकर. 

2/6

'मास्टर ब्लास्टर'च्या लेकिवर नेटकरी फिदा

सचिनची ही लाडाची लेक तिच्या अदांनी सर्वांचीच मनं जिंकत आहे.   

3/6

'मास्टर ब्लास्टर'च्या लेकिवर नेटकरी फिदा

तसं सचिन आणि त्याच्या मुलीचं नातं फार खास. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा खुद्द त्यानंच हे सुरेख नातं सर्वांपुढं आणलं आहे. 

4/6

'मास्टर ब्लास्टर'च्या लेकिवर नेटकरी फिदा

मुलीसोबत तिच्या मित्रांप्रमाणेच वावरणारा, पण खऱ्या अर्थानं तिची वेळोवेळी काळजी घेणारा सचिन अनेकदा पाहायला मिळतो. सारा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. ती अनेक फोटोही शेअर करत असते. 

5/6

'मास्टर ब्लास्टर'च्या लेकिवर नेटकरी फिदा

तिच्या याच अदा पाहून असंख्य फॉलोअर्सनी तर, कलाविश्वात तिनं नशीब आजमावून पाहावं असा सल्लाही तिला दिला आहे. 

6/6

'मास्टर ब्लास्टर'च्या लेकिवर नेटकरी फिदा

सारा कलाविश्वात पदार्पण करणार की नाही, ही फार दूरची गोष्ट. पण, तूर्तास नेटकऱ्यांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरली आहे हे मात्र खरं. (सर्व छायाचित्रे - इन्स्टाग्राम)