Satish Kaushik Death : निधनाआधी सतीश कौशिक यांनी शेअर केली होती 'ही' अखेरची पोस्ट

Satish Kaushik Death : अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Death) हे त्यांच्या मीस्टर इंडिया या चित्रपटासाठी ओळखले जातात. सतीश हे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गुरुग्राम येथे गेले होते. त्यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. 

Mar 09, 2023, 12:52 PM IST

Satish Kaushik Last Post: बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं काल बुधवारी 8 मार्च रोजी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्यानं सतीश कौशिक यांचे निधन झाले. खरं तर होळी पार्टीसाठी सतीश कौशिक हे पोहोचले होते. त्यानंतर त्यांना बरं वाटतं नसल्याची तक्रार त्यांनी केली. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता सतीश कौशिक यांची अखेरची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

1/6

Satish Kaushik last post before Death holi special

सतीश कौशिक यांनी त्यांच्या निधनाच्या काही वेळ आधीच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून होळी पार्टीतील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. (Holi Party) 

2/6

Satish Kaushik last post before Death holi special

सतीश कौशिक यांनी शेअर केलेल्या अखेरच्या पोस्टमध्ये सगळ्यात पहिला फोटो हा अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) दिसत आहेत. नव विविहाती दामप्त्याला सतीश कौशिक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

3/6

Satish Kaushik last post before Death holi special

सतीश कौशिक यांनी पुढे जावेद अख्तर (Javed Akhatr) यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. सतीश यांनी नारंगी रंगाचं टी-शर्ट परिधान केलं आहे तर जावेद अख्तर यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. 

4/6

Satish Kaushik last post before Death holi special

सतीश यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) देखील दिसली आहे. 

5/6

Satish Kaushik last post before Death holi special

हे सगळे फोटो शेअर करत सतीश कौशिक म्हणाले, 'रंगेबीरंगी होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा... यावेळी होळीचं सेलिब्रेशन Janki Kutir Juhu येथे.' 

6/6

Satish Kaushik last post before Death holi special

सतीश कौशिक यांनी 1983 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सतीश कौशिक हे सगळ्यात शेवटी रकुल प्रीत सिंह 'छत्रीवाली' (Chhatriwali) या चित्रपटात दिसले होते.