'तुम साथ हो....'; अभिनेत्रीनं फिल्मी अंदाजात दिली लग्नाची गोड बातमी

Oct 06, 2020, 15:52 PM IST
1/6

'तुम साथ हो, तो फिर क्या बाकी है; मेरे लिए तुम काफी हो'; असं लिहित अतिशय फिल्मी अंदाजात एका टेलिव्हिजन अभिनेत्रीनं आपण लग्नगाठ बांधल्याची गो़ड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

2/6

विवाहसोहळ्यातील काही सुरेख क्षण शेअर करत आपल्या जीवनातील एका नव्या प्रवासाबद्दल माहिती देणारी अभिनेत्री आहे, निती टेलर. 

3/6

परिक्षित बावा याच्यासह नितीनं गुरुद्वारा पद्धतीनं लग्नगाठ बांधल्याचं या पोस्टमध्ये लिहिलं. 

4/6

१३ ऑगस्ट २०२० लाच निती आणि परिक्षितच्या या नव्या प्रवासाची सुरुवात झाली. पण, कोरोनाचं हे संकट संपेल आणि तेव्हा या खास दिवसाचा आनंद आणखी सुरेख पद्धतीनं साजरा करण्याची तिची इच्छा होती. 

5/6

परिस्थितीचं एकंदर चित्र पाहता अखेर तिनं सोशल मीडियाचा आधार घेतच चाहत्यांसमवेत ही शुभवार्ता शेअर केली. सोबतच येणारं वर्ष आनंददायी असेल अशी आशाही तिनं व्यक्त केली. 

6/6

(सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)