Shocking : Wedding Dress मध्येच अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार; लग्नाआधी नियतीचा घाला, धक्कादायक कारण समोर

आयुष्य आपल्याला कधी कोणत्या वळणावर आणेल याची काहीच शाश्वती नसते. अमेरिकेतील (US) लॉस एन्जलिस (Los Angeles) मधून डोळे विस्फारणारी बातमी समोर आली आहे. 

Sep 05, 2022, 16:25 PM IST

Drug Overdose Death: आयुष्य आपल्याला कधी कोणत्या वळणावर आणेल याची काहीच शाश्वती नसते. अमेरिकेतील (US) लॉस एन्जलिस (Los Angeles) मधून डोळे विस्फारणारी बातमी समोर आली आहे. 

1/5

इथे एका मॉडेलचा ड्रग ओवरडोज (Drug Overdose)मुळं अपघात झाला आहे. Christy Giles असं या अभिनेत्रीचं नाव असून, तिच्यासोबत जे घडलंय इतकं वाईट कोणासोबतही घडू नये, अशीच प्रतिक्रिया अनेजकण देत आहेत. (Shocking news Christy Giles death due to Drug Overdose)

2/5

मॉडेलिंग आणि अभिनय (Modelling And Acting) क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या क्रिस्टी गिल्स (Christy Giles) हिचा (Drug ) ड्रग ओवरडोजमुळं मृत्यू झाल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. तिच्या निधनानं खचलेल्या आई- वडिलांनी काळजावर दगड ठेवून लग्नासाठी खरेदी (Wedding Dress) केलेल्या पेहरावातच तिला अखेरचा निरोप दिला. 

3/5

क्रिस्टी गिल्सवर (Americas alabama) अमेरिकेतील अलबामा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. याच ठिकाणी तिचं लग्न होणार होतं. क्रिस्टीचा साखरपुडा (Engagment) 2019 मध्ये झाला होता. जेन सिलिर्स (Jan Cilliers)सोबत तिचा साखरपुडा झाला होता. 

4/5

एका मुलाखतीमध्ये क्रिस्टीच्या आई-वडिलांनी भावनिक होत लेकिला लग्नाच्या पोषाखात पाहण्याची इच्छा व्यक्त केली. लग्नाआधीच नियतीनं क्रिस्टीवर घाला घातला आणि (Wedding) लग्नासाठी येऊ पाहणाऱ्या पाहुण्यांपर्यंत तिच्या निधनाची बातमी पोहोचली हे सांगताना तिच्या आई- वडिलांना हुंदका दाटला. 

5/5

सूत्रांच्या माहितीनुसार एका रुग्णालयाबाहेर क्रिस्टी मृत स्वरुपात आढळली. तिच्या निधनाची माहिती मिळताच आई- वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. क्रिस्टीनं लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा गाऊन खरेदी केला होता. अखेरचा निरोप देण्यापूर्वी तिचा एक फोटोही काढण्यात आला होता. क्रिस्टीला निरोप देतानाचे क्षण सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरले.