Shubman Gill : हातात बॅट, चेहऱ्यावर गोंडस हास्य... 'या' खेळाडूने भारतीयांना लावलं वेड

Shubman Gill IND vs NZ : क्रिकेटचं मैदान असो किंवा लव्ह लाइफ, फोटोतील या चिमुकल्याने सध्या जगाला वेड लावलं आहे. सोशल मीडियावर तर त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात सर्च केलं जातं आहे. याच मैदानात रेकॉर्डब्रेक कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे लहानपणीचे फोटो तुम्ही नक्कीच पाहिले नसाल. 

Jan 25, 2023, 09:35 AM IST

Shubman Gill Unseen Rare Childhood Photos : हातात बॅट, चेहऱ्यावर गोंडस हास्य...या चिमुकल्याने सध्या सगळ्यांना क्रेझी केलं आहे. हा खेळाडू मैदानासोबतच सोशल मीडियावरही (Social media) धुमाकूळ घालत आहे.  भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सिरीजमधील तिसरा आणि अखेरचा सामना या युवा खेळाडूने तर कमालच केली राव...क्रिकेटच्या मैदानासोबत या खेळाडूच्या लव्ह लाइफ खूप चर्चेत असते. सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) की सारा अली खान (Sara Ali Khan) नक्की कोणासोबत या खेळाडूचं सूत जुळलं आहे (Shubman Gill Love Life), यावर अगदी रोज चर्चा होतेय. आता तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल या चिमुकल्या कोण आहेत ते...बरोबर आम्ही टीम इंडियाचा सलामीवीर (Team India's opener) शुभमन गिलबद्दलचं बोलतो आहोत. आज आम्ही भारतीय क्रिकेटचा चमकता तारा शुभमन गिलचे बालपणीचे कधीही न पाहिलेले फोटोही तुम्हाला दाखवणार आहोत. (Shubman Gill Unseen Rare Childhood Photos interesting facts that you should know about shubman gill marathi news)

1/6

पठ्ठ्यानं मैदान मारलंय!

Shubman Gill Unseen Photos

पहिल्या वनडेत शानदार द्विशतक झळकावणारा गिलने भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ)  मॅचदरम्यान पुन्हा एकदा शानदार शतक झळकावलं. या शतकानंतर गिलचं असं काही आकडे समोर आले आहेत, जे तो महान फलंदाज असल्याची ग्वाही देत ​​आहेत.

2/6

किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला

Shubman Gill Unseen Photos

विराट कोहलीने (Virat Kohli Record) भारतासाठी तीन सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. कोहलीने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 286 धावा केल्या होत्या. आता शुभमन गिलने 360 धावा करून किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला आहे.   

3/6

बाबरच्या विक्रमाची बरोबरी

Shubman Gill Unseen Photos

पहिल्या सामन्यात 212 धावा आणि मंगळवारच्या सामन्यात शतक यामुळे गिलची या मालिकेत 360 धावा पूर्ण झाल्या. तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम (Most runs in a bilateral series) याआधी बाबर आझमच्या (Babar Azam) नावावर आहे. बाबरने 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 360 धावा केल्या होत्या. याचाअर्थ शुभमनने बाबरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 

4/6

असाही एक विक्रम

Shubman Gill Unseen Photos

शुभमन गिलने एकदिवसीय सामन्यांच्या शेवटच्या 18 डावांमध्ये 86 च्या सरासरीने 1204 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 6 अर्धशतकं, 4 शतकं आणि एक द्विशतकाचा समावेश आहे. 

5/6

पंजाबचा शेर!

Shubman Gill Unseen Photos

शुभमन गिलचा जन्म 8 सप्टेंबर 1999 रोजी फाजिल्का, पंजाबमध्ये झाला. पंजाबमधील मोहालीमधील मानव मंगल स्मार्ट स्कूलमधून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं. शुभमनला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड हे दिग्गज त्याचे प्रेरणास्थान आहेत.

6/6

शुभमनला शेती करायची होती

Shubman Gill Unseen Photos

शुभमन गिलच्या वडिलांनी लखविंदर सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शुभमनला  लहानपणापासूनच शेतीची आवड होती आणि त्यालाही शेती करायची होती.