श्वेता तिवारीच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पलक देखील आई प्रमाणे अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी इच्छूक आहे.

Feb 29, 2020, 15:43 PM IST

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पलक कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी तिचे वेग-वेगळे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

1/7

पलक लवकरच अभिनय क्षेत्रात डेब्यू करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

2/7

छोट्या पडद्यावरून ती पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. परंतु श्वेताने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

3/7

पलक देखील आई प्रमाणे अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी इच्छूक आहे. परंतु आतापर्यंत तिच्या डेब्यू संदर्भात कोणतीही बातमी समोर आलेली नाही. 

4/7

काही दिसवांपूर्वी पलकने एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी तिला ओठांची सर्जरी केली आहे का? असा प्रश्न विचारला होता. नेटकऱ्यांच्या या प्रश्नाला पलकने सडेतोड उत्तर दिले होते. 

5/7

पलकचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर काही मिनिटांतच व्हायरल होतात. 

6/7

श्वेता आणि पलकने नुकताच एका लग्न समारंभात हजेरी लावली होती. यादरम्यानचे काही फोटो देखील पलकने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  

7/7

शिवाय तिच्या फोटोशूटचे फोटो देखील मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.