उन्हाळ्यात पिताय फ्रीजमधील थंड पाणी? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Cold Water Drinking Side Effects: उन्हाळ्यात तहान लागली की आपण सगळ्यात आधी थंड पाणी मिळेल का पाहतो. कारण त्यानं लगेच आपल्याला थंडावा जाणवतो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात आपण हायड्रेटेड राहण्यासाठी अनेक लिक्विड ड्रिंक्स घेतो, उदा. ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत तर काही लोक सॉफ्ट ड्रिंक्स घेतात. पण उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड पाणी लोक सर्सा पितात. फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्यानं तुमच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया काय होऊ शकतो त्रास...

| May 03, 2023, 15:41 PM IST
1/7

डोकेदुखी

Summer Tips avoid drinking cold water

उन्हात असताना किंवा उन्हातून घरी आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यानं डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. शिवाय नसा थंड होतात आणि मेंदुला ऑक्सिजन मिळण कठीण होतं. तर काही लोकांना सायनसचा त्रास होऊ लागतो. 

2/7

घसा खवखवतो

Summer Tips avoid drinking cold water

जर तुम्ही अचानक फ्रीजचं पाणी प्यायलात तर त्यानं सर्दी होते. तर काहींना श्वासोच्छवासाचा त्रास होतो. तर याच वेळात अनेकांच्या थायरॉईड आणि टॉन्सिल्सच्या गाठींची वाढ होऊ शकते. 

3/7

हृदयाचे ठोके हळूहळू होतात

Summer Tips avoid drinking cold water

थंड पाणी प्यायल्यानं हृदयाचे ठोके मंदावण्याची शक्यता असते. थंड पाण्याचा थेट परिणाम व्हॅगस नर्व्हवर होतो, त्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात.

4/7

पचनक्रिया मंदावते किंवा अपचन

Summer Tips avoid drinking cold water

आयुर्वेदानुसार, थंड पाणी प्यायल्याने पचनशक्ती मंदावते. जेवण केल्यानंतर पचन प्रक्रिया जेव्हा सुरु असते तेव्हा पाणी प्यायला नको, नाही तर अपचनची समस्या उद्भवू शकते.   

5/7

वजन वाढते

Summer Tips avoid drinking cold water

सतत फ्रीजचं थंड पाणी प्यायल्यानं वजन वाढण्याची शक्यता वाढते. वजन कमी करायचे असल्यासं थंड पाणी पिणे बंद करा. 

6/7

बद्धकोष्ठता

Summer Tips avoid drinking cold water

फ्रीजमधील पाणी प्यायल्यानं तुम्हाला आतड्यांच्या समस्या होऊ शकतात. कधी पोट दुखू शकते तर तर पोच साफ न होण्याची देखील समस्या उद्भवते. 

7/7

उन्हाळ्यात कसे पाणी प्यावे

Summer Tips avoid drinking cold water

उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचा सल्ला अनेक लोक देतात. ते नसेल तर रूम टेम्परेचरवर असलेलेले पाणी तुम्ही पिऊ शकतात. (All Photo Credit : File Photo) (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)