सर्व इन्व्हेस्टमेंट स्किम्सचा बाप! एका ट्रीकने इतके पैसे कमवाल की नोटा मोजून दमाल

दरमहा फक्त 5 हजार रुपये गुंतवूनही तुम्ही काही वर्षांत इतके पैसे कमवाल की तुमची तिजोरी भरली जाईल.

| Sep 10, 2024, 11:16 AM IST

Investment Trick: दरमहा फक्त 5 हजार रुपये गुंतवूनही तुम्ही काही वर्षांत इतके पैसे कमवाल की तुमची तिजोरी भरली जाईल.

1/8

सर्व इन्व्हेस्टमेंट स्किम्सचा बाप! एका ट्रीकने इतके पैसे कमवाल की नोटा मोजून दमाल

SIP Investment Trick Make you Crorepati Personal Finance Tips

SIP Investment Trick:अलीकडच्या काळात एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा कल झपाट्याने वाढत चाललाय.एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळतो, त्यामुळे ही योजना अधिक लोकप्रिय होत चालली आहे. तुम्हालाही SIP सुरू करायची असेल तर फक्त एक ट्रीक माहिती असायला हवी.

2/8

दरमहा फक्त 5 हजार गुंतवा

SIP Investment Trick Make you Crorepati Personal Finance Tips

दरमहा फक्त 5 हजार रुपयांच्या एसआयपीने सुरुवात करूनही, तुम्ही काही वर्षांत इतके पैसे कमवाल की तुमची तिजोरी भरली जाईल. तुम्हाला तुमच्या निवृत्तीच्या वयात आर्थिक बाबतीत कोणाचीही मदत घेण्याची गरज भासणार नाही. पण हा मोठा फंड कसा बनवायचा? ते जाणून घ्या.

3/8

टॉप-अप एसआयपी

SIP Investment Trick Make you Crorepati Personal Finance Tips

पैसे कमवण्यासाठी तुम्हाला तुमची SIP टॉप अप करावी लागेल. त्याला स्टेप-अप एसआयपी असेही म्हणतात. हे टॉप-अप दरवर्षी करावे लागेल. दरमहा 5 हजारच्या एसआयपीमध्ये प्रत्येक वर्षी 10% ने टॉप-अप करा. म्हणजेच प्रत्येक वर्षी तुमच्या SIP मध्ये एक छोटी रक्कम वाढवा. या एका ट्रीकने तुम्ही काही वर्षात खूप मोठी रक्कम जमा करु शकाल.

4/8

5 हजार रुपये एसआयपी आणि टॉप-अप

SIP Investment Trick Make you Crorepati Personal Finance Tips

तुम्ही 5 हजार रुपयांची SIP सुरू केली, तर वर्षभर दरमहा 5 हजार रुपये जमा होत राहतील. त्यानंतर पुढच्या वर्षी 5 हजारच्या च्या 10% म्हणजेच 500 रुपयांची एसआयपी वाढवा. दुसऱ्या वर्षात तुमची एसआयपी 5,500 रुपयांची असेल.

5/8

दरवर्षी 10 टक्के वाढ

SIP Investment Trick Make you Crorepati Personal Finance Tips

त्यानंतर तिसऱ्या वर्षी 5,500 रुपयांच्या 10 टक्के म्हणजेच 550 रुपये वाढवा. तुमची SIP तिसऱ्या वर्षी 6,050 रुपये झालेली असेल. अशा प्रकारे, तुम्हाला सध्याच्या SIP मध्ये दरवर्षी 10 टक्के वाढ करावी लागेल. या  ट्रिकने 20, 25 आणि 30 वर्षात किती कमाई होईल? जाणून घेऊया.

6/8

20 वर्षात किती पैसे कमवाल?

SIP Investment Trick Make you Crorepati Personal Finance Tips

या ट्रीकने तुम्ही सतत 20 वर्षे SIP सुरू ठेवल्यास, तुम्ही 34 लाख 36 हजार 500 रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवाल. तुम्हाला यावर 65 लाख 7 हजार 858 रुपये व्याज मिळेल आणि तुमच्याकडे 99 लाख 44 हजार 358 रुपये असतील.

7/8

25 वर्षात किती पैसे जमा?

SIP Investment Trick Make you Crorepati Personal Finance Tips

तुमची गुंतवणूक अशीच 25 वर्षे चालू ठेवल्यास एकूण 59 लाख 824 रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर रु. 1 कोटी 54 लाख 76 हजार 907 चे व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 2 कोटी 13 लाख 77 हजार 731 मिळतील.

8/8

30 वर्षात किती रक्कम?

SIP Investment Trick Make you Crorepati Personal Finance Tips

या ट्रीकने 30 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास, तुमची गुंतवणूक 98 लाख 69 हजार 641 रुपये इतकी असेल. यावर तुम्हाला 3 कोटी 43 लाख 976 चे व्याज मिळेल आणि मॅच्युरिटी रक्कम 4 कोटी 41 लाख 70 हजार 618 रुपये इतकी असेल.