रोज 100 रुपये वाचवून बना करोडपती! कसे ते जाणून घ्या

Investment Planing: तुम्ही काही वर्षांत स्वतःला करोडपती बनवू शकता आणि तुमचे भविष्य सुधारू शकता. कसे? ते सविस्तर जाणून घेऊया.

| Nov 18, 2023, 10:08 AM IST

Systematic Investment Plan: जर तुम्ही दररोज 100 रुपयांची बचत केली तर तुमचे एका महिन्यात 3000 रुपये वाचतील.

1/10

रोज 100 रुपये वाचवून बना करोडपती! कसे ते जाणून घ्या

SIP Save Daily 100 Rupees become Crorepati via Systematic Investment Plan Marathi News

How to Become Crorepati: आपण करोडपती व्हावं असे प्रत्येक मध्यमवर्गीयांचे मोठे स्वप्न असते. करोडपती बनण्यासाठी कमाई जितकी महत्वाची असते तितकीच गुंतवणूक महत्वाची असते. मध्यमवर्गीय आपल्या उत्पन्नातून थोडीफार बचत करून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांच्यावरही खूप जबाबदाऱ्या असतात.

2/10

पद्धतशीर गुंतवणूक योजना

SIP Save Daily 100 Rupees become Crorepati via Systematic Investment Plan Marathi News

अशा स्थितीत त्यांनी आपला पैसा जिथे गुंतवला, तिथून चांगला परतावा मिळावा, अशी त्यांची अपेक्षा असते. या परिस्थितीत अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी, SIP म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना हा एक चांगला पर्याय असू शकतो.

3/10

आर्थिक नियोजन

SIP Save Daily 100 Rupees become Crorepati via Systematic Investment Plan Marathi News

तुमचा पगार दरमहा 15 हजार असेल तरी तुम्ही करोडपती बनण्याच्या दिशेने वाटचाल करु शकता. यासाठी फक्त तुमच्याकडे आर्थिक नियोजन आणि आर्थिक शिस्त असणे गरजेचे आहे. तुम्ही दरमहा तुमच्या पगारातून तुमच्या बचतीचा एक छोटासा भाग SIP मध्ये गुंतवू शकता. 

4/10

दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक

SIP Save Daily 100 Rupees become Crorepati via Systematic Investment Plan Marathi News

दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून, तुम्ही तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न देखील पूर्ण करू शकता. तुम्ही दररोज 100 रुपये वाचवलेत तरीही तुम्ही काही वर्षांत स्वतःला करोडपती बनवू शकता आणि तुमचे भविष्य सुधारू शकता. कसे? ते सविस्तर जाणून घेऊया.

5/10

दररोज 100 रुपये वाचवा

SIP Save Daily 100 Rupees become Crorepati via Systematic Investment Plan Marathi News

जर तुम्ही दररोज 100 रुपयांची बचत केली तर तुमचे एका महिन्यात 3000 रुपये वाचतील. तुम्ही ही रक्कम SIP मध्ये सतत 30 वर्षे गुंतवता. तज्ञांच्या मते, दीर्घकालीन SIP वर सरासरी12 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

6/10

12 टक्के व्याज

SIP Save Daily 100 Rupees become Crorepati via Systematic Investment Plan Marathi News

SIP कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही 30 वर्षात फक्त 10 लाख 80 हजार 000 रुपये गुंतवाल, तर 12 टक्के व्याज म्हणून तुम्हाला 95 लाख 9 हजार 741 रुपये मिळतील. अशा स्थितीत 30 वर्षांनंतर तुम्ही 1 कोटी 5 लाख 89 हजार 741 रुपयांचे मालक व्हाल.

7/10

15 हजार पगार असेल तर..

SIP Save Daily 100 Rupees become Crorepati via Systematic Investment Plan Marathi News

आजच्या काळात 3,000 रुपये ही इतकी मोठी रक्कम नाही की ती वाचवता येणार नाही. तुम्ही तुमच्या उत्पन्नातील किमान 20 टक्के बचत करून गुंतवणूक करावी, असे आर्थिक नियम सांगतो.

8/10

20 टक्के गुंतवा

SIP Save Daily 100 Rupees become Crorepati via Systematic Investment Plan Marathi News

तुम्ही महिन्याला 15 हजार रुपये कमावत असाल तरी त्यातील 20 टक्के म्हणजे 3,000 रुपये गुंतवा. आर्थिक शिस्त पाळून तुम्ही ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत गुंतवली पाहिजे. 

9/10

गुंतवणूक वर्षाला वाढवा

SIP Save Daily 100 Rupees become Crorepati via Systematic Investment Plan Marathi News

तुमचे उत्पन्न कालांतराने वाढेल आणि अशा परिस्थितीत तुम्हाला एसआयपीसाठी दरमहा 3 हजार रुपये काढणे फारसे अवघड जाणार नाही. यानंतर तुम्ही आपली गुंतवणूक वर्षाला वाढवा.

10/10

तुमचे भविष्य सुरक्षित

SIP Save Daily 100 Rupees become Crorepati via Systematic Investment Plan Marathi News

तुमचे उत्पन्न वाढवल्यानंतर, तुम्ही SIP सुरू ठेवून इतर गुंतवणूक पर्याय सहजपणे निवडू शकता आणि तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.