जबरदस्त कॅमेरासह samsungचा नवा स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

सॅमसंगने (Samsung) बुधवारी प्रिमियम गॅलेक्सी ए७१ (Samsung Galaxy A71) स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. 

Feb 20, 2020, 13:41 PM IST

Samsung Galaxy A71 हा स्मार्टफोन, आधी आलेल्या Samsung Galaxy A70चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. 

1/5

'Samsung Galaxy A71'मध्ये ६.७ इंची फुल HD सुपर AMOLED डिस्प्ले आहे. ८ जीबी रॅमसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आलाय. 

2/5

या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि ५-५ मेगापिक्सलचे डेप्थ सेन्सर देण्यात आले आहेत. सेल्फीप्रेमींसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

3/5

फोनमध्ये १२८ जीबी  इंटरनल  मेमरी असून मायक्रो एसडी कार्डने मेमरी ५१२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. 

4/5

'सॅमसंग गॅलेक्सी ए७१'मध्ये ४५००mAhची बॅटरी आहे. यात USB C पोर्ट देण्यात आलाय. हा फोन Prism Crush Silver, Prism Crush Blue आणि Prism Crush Black रंगात उपलब्ध आहे. 

5/5

या स्मार्टफोनची किंमत २९,९९९ रुपये इतकी आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारीपासून या फोनची विक्री सर्व रिटेल स्टोर आणि ऑनलाईन सुरु होणार आहे.