दैवी शक्ती असणाऱ्या पंचकन्या ; ज्या मुलं होऊनही कुमारी राहिल्या

हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आणि उपासना यांना विशेष स्थान आहे. त्यातबरोबर हिंदू धर्मामध्ये अशा काही दैवी मुलींबद्दल सांगितले आहे ज्यांच्याकडे दैवी शक्ती होत्या. खरतर शास्त्रात या कन्यांचा उल्लेख आपल्या शास्त्रामध्येही केलेला आहे. त्यासोबतच त्यांना भगवंताचा विशेष आशीर्वाद देखील मिळाला. 

Aug 10, 2024, 15:56 PM IST
1/6

हिंदू धर्मामध्ये पंचकन्यांना देवाचं स्थान दिलं आहे. असे म्हटले जाते की या पंचकन्या मुलं झाल्यानंतरही कुमारी म्हणूनच ओळखून आल्या. 

2/6

देवी अहिल्या

वाल्मिकी रामायणातील बालकांडमध्ये अहिल्या देवींचा उल्लेख केला आहे. अहिल्या देवींचा विवाह गौतम ऋषींशी झाला होता. इंद्रदेवाने फसवल्यानंतर ऋषी गौतम यांनी तिला कायमचा दगड बनण्याचा श्राप दिला होता. त्रेतायुगात जेव्हा प्रभू श्रीरामांनी अहिल्याला पायांनी स्पर्श केला तेव्हा तिला पुन्ही स्त्री रूप प्राप्त झाले.यामुळे तिला आजीवन कुमारी म्हटले गेले.   

3/6

द्रौपदी

पौराणिक कथेनुसार  अतिशय सुंदर स्त्री म्हणजेच द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला.असे म्हटले जाते की पाच पांडवांशी विवाह केल्यानंतरही द्रौपदी नेहमी कुमारीच राहिली.   

4/6

मंदोदरी

लंकापती रावणाची पत्नी हिचे नाव देखील पंचकन्यांमध्ये आहे.तिचे लग्न रावमासोबत झाले होते. बलवान मुलांची आई असतानाही मंदोदरीचे कौमार्य तसेच राहिले. 

5/6

तारा

 तारा ही अप्सरा होती जिचा विवाह बाली सोबत झाला होता. असे म्हटले जाते की ताराला देवांकडून शाश्वत कौमार्य प्राप्त झाले होते. 

6/6

कुंती

कुंतीचा विवाह हस्तिनापूरचा राजा पांडूशी झाला होता. पण पांडूला शाप होता की जर त्याने त्याची पत्नी कुंतीला स्पर्श केला तर तो मरण पावेल. त्याचवेळी कुंती देवांच्या आशीर्वाने मातृत्व प्राप्त झाले. पण मुल झाल्यानंतरही कुंती कायम कुमारीच मानली जात होती.