पृथ्वी 5 सेकंदांसाठी फिरायची थांबली तर? आधी सर्व पाणी दोन्ही ध्रुवांकडे जाईल, मग जमिनीला...

What If Earth Stopped Spinning: पृथ्वी फिरणं पाच सेकंदांसाठी बंद झालं तर जास्तीत जास्त काय होईल दिवस किंवा रात्र पाच सेकंदांनी लांबेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. खरंच केवळ 5 सेकंद पृथ्वी फिरायची थांबली तर काय होईल पाहूयात...

| Aug 10, 2024, 15:27 PM IST
1/10

What If Earth Stopped Spinning

अवघ्या पाच सेकंदांमध्ये एवढं काही होऊ शकतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण खरंच पृथ्वी पाच सेकंद फिरायची थांबली तर काय होईल जाणून घ्या...

2/10

What If Earth Stopped Spinning

पृथ्वी फिरायची थांबली तरी पृथ्वी भोवतीचं वातावरणाचे स्तर फिरत राहतील. म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं तर जोरदार वारे वाहू लागतील.  

3/10

What If Earth Stopped Spinning

विषुववृत्ताजवळ पृथ्वी अधिक वेगाने फिरते. त्यामुळेच पृथ्वी फिरायची थांबली तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये 670 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.  

4/10

What If Earth Stopped Spinning

हे वारे इतके शक्तीशाली असतील की पृथ्वीला भेगा पडू लागतील. घरं, गाड्या सगळं काही हवेत उडू लागेल.

5/10

What If Earth Stopped Spinning

मात्र या साऱ्या गोष्टी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबाहेर जाणार नाही. म्हणजेच कोणतीही वस्तू अंतराळात फेकली जाणार नाही. कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचं बळ तोडण्यासाठी 40 हजार किलोमीटर प्रति तास वेग आवश्यक असतो. याचा पृथ्वीची एक्सेप व्हेलॉसिटी असंही म्हणतात.

6/10

What If Earth Stopped Spinning

आपली पृथ्वी पूर्णपणे गोलाकार नसून विषुववृत्ताजवळ फुगलेली आहे. त्यामुळेच पृथ्वी पाच सेकंदासाठी फिरायची थांबली तरी समुद्रातील सगळं पाणी दोन्ही ध्रुवांकडे फिरेल आणि मोठ्या त्सुनामी येतील.  

7/10

What If Earth Stopped Spinning

पाच सेकंदांनी पुन्हा पृथ्वी नियमितपणे फिरु लागल्यात पुन्हा पाण्याची ही मोठी भिंत जवळपास सारं काही उद्धवस्त करुन टाकेल. म्हणजेच सर्व भागाला दोनदा त्सुनामीचा फटका बसेल.  

8/10

What If Earth Stopped Spinning

त्यातल्या त्यात केवळ दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर असल्यास या पाच सेकंदांसाठी सुरक्षित राहता येईल. कारण या ठिकाणी फार वेगाने वारे या काळात वाहणार नाहीत.  

9/10

What If Earth Stopped Spinning

आता पृथ्वी नियमितपणे फिरु लागली तर सारं काही पूर्वीसारखं नसेल. सर्व इमारती, शेत जमीन, बांधकाम, तंत्रज्ञान आणि मानवनिर्मिती जवळपास सर्वच गोष्टी नष्ट झालेल्या असतील.  

10/10

What If Earth Stopped Spinning

मात्र एवढं सगळं झाल्यानंतर होणारी हानी पाहण्यासाठी पृथ्वीवर कोणी जिंवंत असेल की नाही हे सांगता येणार नाही. तरीही पुढील काही लाख वर्ष तरी पृथ्वी फिरायची थांबेल असं शास्त्रज्ञांना वाटतं नाही.