अभिनय सेकेंडरी, सुनील शेट्टी 'या' बिझनेसमधून वर्षाला कमावतो 100 कोटी रुपये

सुनील शेट्टी उर्फ अण्णा आपला 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या साधेपणासोबतच सर्वोत्तम कमाईसाठी सुनील शेट्टी अतिशय चर्चेत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सुनील शेट्टीचा नेट वर्थ पाहणार आहे. 

| Aug 11, 2024, 16:28 PM IST

'अण्णा' या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील शेट्टीचा 11 ऑगस्ट रोजी 63 वा वाढदिवस आहे. सुनील शेट्टी आज देशातील सर्वात श्रीमंत स्टार्सपैकी एक आहे आणि एक अब्जाधीश उद्योगपती देखील आहे. पण एकेकाणी त्याने खूप वाईट काळ पाहिला होता. सुनील शेट्टीचे वडील वीरप्पा शेट्टी अवघ्या 9 वर्षांचे असताना मुंबईत आले.

1/7

वडिलांच्या संघर्षातून सुनील शेट्टीला खूप काही शिकायला मिळाले. सुनील शेट्टीचे वडील हॉटेलमध्ये टेबल साफ करायचे आणि नंतर एका रेस्टॉरंटचे मॅनेजर झाले. सुनील शेट्टीने ठरवले होते की त्याला खूप नाव आणि पैसा कमवायचे आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या वडिलांना कौतुक वाटेल असं काही तरी करायचं होतं. सुनील शेट्टी हे काम करण्यास एवढा सक्षम झाला की, पुढे त्याने वडील काम करत असलेल्या तीन इमारती विकत घेतल्या. सुनील शेट्टी हा एक स्टार असल्याने अतिशय साधी जीवनशैली फॉलो करतो, पण त्याची नेट वर्थ आणि मालमत्ता काय आहे हे तुम्हाला अचंबित करणारा आहे. 

2/7

जन्म

सुनील शेट्टी यांचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकातील मंगळूर येथील एका गावात झाला. त्यांनी आपला बराचसा वेळ कर्नाटकात घालवला आणि तिथेच शिक्षण घेतले. नंतर कुटुंबासह मुंबईत आले. सुनील शेट्टी हा केवळ एक यशस्वी सिनेस्टार नाही तर एक जबरदस्त उद्योगपती देखील आहे.

3/7

सर्वोत्कृष्ठ व्यवसायिक

सुनील शेट्टी आज अब्जाधीश आणि अफाट संपत्तीचा मालक आहे. सुनील शेट्टीने प्रॉडक्शन हाऊसपासून ते रिअल इस्टेटपर्यंत आणि अनेक स्टार्ट अप्सपर्यंत सर्व गोष्टींमध्ये भरपूर पैसे गुंतवले आहेत, जिथून त्याला प्रचंड उत्पन्न मिळते.

4/7

निर्माता

सुनील शेट्टी हा एक यशस्वी निर्माता देखील आहे आणि त्याने त्याच्या प्रोडक्शन हाऊस 'पॉपकॉर्न एंटरटेनमेंट' च्या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'बार आणि क्लब' व्यतिरिक्त, तो अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सचा मालक आहे, जे उडपी, कर्नाटकसह देशातील अनेक शहरांमध्ये आहेत.

5/7

संपत्ती

कॅकनॉलेजच्या अहवालानुसार, सुनील शेट्टीची 2024 मध्ये 125 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 25 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग असलेले सुनील शेट्टी यांच्याकडेही अनेक दुकाने आहेत. आजकाल सुनील कमी चित्रपट करत असला तरीही तो वर्षाला 100 कोटींहून अधिक कमावतो.

6/7

पत्नी

सुनील शेट्टीच्या पत्नीचे डेकोर सेंटर असून त्यातून करोडो रुपये कमावले जातात. याशिवाय, अभिनेत्याची FTC नावाची स्वतःची ऑनलाइन कंपनी आहे, ज्याद्वारे नवीन कौशल्ये शोधली जातात. एवढेच नाही तर मुंबईत त्याचे दोन क्लब आहेत. सुनील शेट्टी यांचे व्यवसायाचे साम्राज्य उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेले आहे.

7/7

कार

सुनील शेट्टीकडे करोडोंच्या अनेक कार, बाईक आणि वाहने आहेत. त्याच्याकडे Hummer H2, Jeep Wrangler, Toyota Prado Land Cruiser, Mercedes Benz GLS 350D, Jaguar XF आणि Mercedes E-Class या लक्झरी कार आहेत.