'He-Man' धर्मेंद्र यांच्या काही खास गोष्टी

Dec 08, 2019, 18:17 PM IST
1/12

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५मध्ये फगवाडा, पंजाबमध्ये झाला. कलाविश्वातील जबरदस्त अभिनेते धर्मेंद्र यांनी जवळपास २००हून अधिक हिंदी चित्रपटात काम केलं आहे.   

2/12

धर्मेंद्र चित्रपटातील अॅक्शन सीन स्वत:च करत असल्याने त्यांना 'ही-मॅन' देखील बोललं जात.   

3/12

धर्मेंद्र यांना भारत सरकारकडून पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

4/12

१९६० मध्ये धर्मेंद्र यांनी कलाविश्वात 'दिल भी तेरा हम भी तेरे' चित्रपटातून पदार्पण केलं. पण खरी ओळख त्यांना १९६६ मध्ये आलेल्या 'फूल और पत्थर' चित्रपटातून मिळाली.

5/12

धर्मेंद्र यांना अभिनयासाठी फिल्मफेयर लाईफ टाईम अचिव्हमेन्ट पुरस्कारही देण्यात आला आहे.

6/12

धर्मेंद्र यांना लहगानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. धर्मेंद्र शाळेत असताना, शाळा सोडून ते चित्रपट पाहायला जात असल्याचंही बोललं जातं.

7/12

त्यांना चित्रपटांची इतकी आवड होती की, त्यांनी 'दिल्लगी' चित्रपट ४०हून अधिक वेळा पाहिला होता.

8/12

१९६६ मध्ये मिळालेल्या यशानंतर धर्मेंद्र यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. जवळपास तीन दशकं त्यांनी हिंदी कलाविश्वावर राज्य केलं. धर्मेंद्र यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी केवळ ५१ रुपये मिळाले असल्याचं बोललं जातं.

9/12

वयाच्या १९व्या वर्षी धर्मेंद्र यांचं प्रकाश कौर यांच्याशी झालं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना सनी देओल, बॉबी देओल आणि अजिता देओल अशी तीन मुलं आहेत.

10/12

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली भेट 'तुम हसीन मै जवान' या चित्रपटाच्या सेटवर १९७० मध्ये झाली.

11/12

हेमा यांना धर्मेंद्र यांचं आधीच लग्न झालं असून त्यांना मुलं असल्याचंही माहित होतं. पण हेमा यांचं देखील धर्मेंद्र यांच्यावर प्रेम होतं. हेमा यांना इतर अभिनेत्यांकडून लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले पण त्यांचं धर्मेंद्र यांच्यासाठीचं प्रेम कमी झालं नाही.

12/12

हेमा मालिनी यांचे वडिल या दोघांच्या लग्नाच्या विरोधात होते. वडिलांच्या मृत्यूनंतर या दोघांनी लग्न केलं. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोट देण्यास नकार दिला होता. कायद्यानुसार पहिली पत्नी असताना  दुसरं लग्न करणं शक्य नव्हतं. म्हणून धर्मेंद्र यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आणि दोघांनी लग्न केलं. धर्मेंद्र आणि हेमा यांना ईशा आणि आहना या दोन मुली आहेत.