Mobile Tips: स्मार्टफोनच्या 'या' पार्ट्सची घ्या काळजी, अन्यथा महागडा फोन खराब झालाच समजा

Smartphone Care: काही जणांकडे स्मार्टफोन जास्त काळ टिकत नाही. कारण चुकीच्या सवयींमुळे स्मार्टफोन खराब होत असतो. पण असं असलं तरी दुर्लक्ष करतो आणि महागडा फोन खराब होऊ जातो. अशा चुका नकळतपणे घडत असतात. तुम्हीही अशा चुका करत नाही ना...

Jan 15, 2023, 16:18 PM IST
1/5

Smartphone Care

फोटोप्रेमींसाठी सेल्फी कॅमेरा महत्त्वाचा असतो. पण तो स्वच्छ केला नाही तर खूप घाण होतो. तसेच सेल्फी कॅमेर्‍यावर डाग पडू शकतात आणि नंतर फोटो नीट क्लिक होत नाही.  

2/5

Smartphone Care

व्हॉल्यूम रॉकर बाबतीत असंच म्हणावं लागेल. अनेकदा त्याचा वापर नीट होत नसल्याने खूप दाबल्यावरच काम करते. पण त्याचा वापर व्यवस्थितरित्या केल्यास जास्त दाब देण्याची गरज नसते.

3/5

Smartphone Care

चार्जिंग पोर्ट कोणत्याही स्मार्टफोनसाठी महत्त्वाचा आहे. कारण हा पोर्ट खराब झाला तर फोन चार्ज करूच शकत नाही. हा पोर्ट अनेकदा कोणतेही चार्जर वापरल्याने खराब होतो. जर तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

4/5

Smartphone Care

स्मार्टफोनचा मुख्य कॅमेऱ्याची लेन्स खराब होऊ शकते. कारण अनेक वेळा लोक त्याची देखभाल न करता वापरत असतात, अशा परिस्थितीत तुम्ही स्मार्टफोनच्या लेन्ससाठी संरक्षण कवच लावणं गरजेचं आहे.  

5/5

Smartphone Care

स्मार्टफोनचा डिस्प्ले टेम्पर्ड ग्लास किंवा मजबूत फिल्मने झाकून ठेवला नाही तर ते खराब होऊ शकतो. स्मार्टफोन प्रोटेक्ट करणयासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करावे लागू शकतात.