TATA च्या सर्वात स्वस्त SUV ने सर्वांना फोडला घाम, Maruti, Mahindra लाही टाकलं मागे; धडाक्यात होतीये विक्री

जानेवारी महिन्यात एसयुव्ही गाड्यांच्या मागणीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. यादरम्यान टाटाच्या परवडणाऱ्या आणि सर्वात स्वस्त एसयुव्हीने सर्वांना मागे टाकलं.  

Feb 12, 2024, 15:23 PM IST
1/8

स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) सेगमेंट देशात वेगाने प्रसिद्ध होत आहे. खासकरुन कॉम्पॅक्ट आणि मिनी एसयुव्हीला जास्त पसंती दिली जात आहे.   

2/8

जानेवारी महिन्यात एसयुव्ही गाड्यांच्या मागणीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. यादरम्यान टाटाच्या परवडणाऱ्या आणि सर्वात स्वस्त एसयुव्हीने सर्वांना मागे टाकलं.  

3/8

जाणून घ्या जानेवारी महिन्यातील सर्वाधिक विक्री झालेल्या एसयुव्ही गाड्यांबद्दल...  

4/8

Maruti Fronx

Maruti Fronx  मारुती सुझुकीची मिनी एसयुव्ही Fronx ला जानेवारी महिन्यात एकूण 13,643 ग्राहक मिळाले. ही देशातील पाचवी सर्वाधिक विक्री झालेली एसयुव्ही ठरली आहे. या कारची किंमत 7 लाख 51 हजार रुपये आहे.   

5/8

Mahindra Scorpio

Mahindra Scorpio जानेवारीत महिंद्रा स्कॉर्पिओच्या एकूण 14 हजार 293 युनिट्सची विक्री झाली आहे. मागील वर्षातील जानेवारी महिन्याच्या तुलनेत विक्रीत 64 टक्के वाढ पाहण्यास मिळाली आहे. या कारची किंमत 13 लाख 59 हजार रुपये आहे.   

6/8

Maruti Brezza

Maruti Brezza  मारुती ब्रेझा तिसरी सर्वाधिक विक्री झालेली एसयुव्ही आहे. याच्या एकूण 15 हजार 303 युनिट्सची विक्री झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये कंपनीने 14 हजार 359 युनिट्स विकले होते. मारुती ब्रेझाची सुरुवातीची किंमत 8 लाख 34 हजार रुपये आहे.   

7/8

Tata Nexon

Tata Nexon टाटा नेक्सॉनच्या 17 हजार 182 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या 15 हजार 567 युनिट्सच्या तुलनेत ही 10 टक्के वाढ आहे. याची किंमत 8 लाख 10 हजार आहे.   

8/8

Tata Punch

Tata Punch टाटाची सर्वात स्वस्त एसयुव्ही पंचने पहिला क्रमांक मिळवला आहे. कंपनीने टाटा पंचच्या एकूण 17 हजार 978 युनिट्सची विक्री केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 6 लाख आहे.