टीम इंडीयाच्या बॉलरने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर

Feb 04, 2021, 13:13 PM IST
1/6

जयदेव उनादकटने शेअर केले लग्नाचे फोटो

जयदेव उनादकटने शेअर केले लग्नाचे फोटो

भारतीय फास्ट बॉलर जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) ने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. २९ वर्षाच्या बॉलरने मंगळवारी रिन्नीसोबत गुपचूप लग्न केलं. सोशल मीडियावर या जोडीची खूप चर्चा आहे.  

2/6

लग्नाचं निमंत्रण केलं शेअर

लग्नाचं निमंत्रण केलं शेअर

जयदेव उनादकटने सोशल मीडियावर बुधवारी एक फोटो शेयर केला. ज्यामध्ये रिन्नीसोबत लग्नाच्या कपड्यात दिसतोय. यासोबत त्याने लग्नपत्रिका देखील शेअर केली.

3/6

15 मार्च 2020 ला साखरपुडा

15 मार्च 2020 ला साखरपुडा

जयदेवची पत्नी वकील आहे. दोघांनी 15 मार्च 2020 ला साखरपुडा केला.पोरबंदरच्या या बॉलरने बायको रिन्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. साखरपुड्याच्या दोन दिवस आधी उनादकट ने रणजी ट्रॉफी टूर्नामेंट मध्ये सौराष्ट्र टीमचा चॅम्पियनबनला होता.

4/6

उनादकटने IPL मध्ये 81 विकेट

उनादकटने IPL मध्ये 81 विकेट

जयदेव उनादकट आणि रिन्नी खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.  जयदेव उनादकट ने टीम इंडियासाठी 1 टेस्ट, 7 वनडे आणि 10 टी-20 इंटरनेशनल मॅच खेळल्या आहेत. टेस्टमध्ये उनादकटच्या नावे एकही विकेट नाही. वनडेमध्ये उनादकटने 8 विकेट आणि टी-20 मध्ये 14 विकेट घेतलेयत. उनादकट ने 80 आईपीएल मॅचमध्ये 81 विकेट घेतले.

5/6

लग्नाची माहिती मोजक्या लोकानांच

लग्नाची माहिती मोजक्या लोकानांच

जयदेव उनादकट आणि रिन्नी दोघांच्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांनाच लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते. लग्नाचा पूर्ण कार्यक्रम सिक्रेट ठेवला गेला. मंगळवारी रात्री गुजारतच्या आणंद शहरातील मधुबन रिसोर्टमध्ये लग्न पार पडलं.

6/6

लग्नाच्या तारखेपर्यंत गुपित

लग्नाच्या तारखेपर्यंत गुपित

याआधी उनादकट (Jaydev Unadkat) आणि रिन्नी दोघांनी तारीख सोशल मीडियावर शेअर केली नव्हती. उनादकट आणि रिन्नीता संगीत कार्यक्रम सोमवारी झाला. याचे काही व्हिडीओ उनादकटच्या मित्रांनी सोशल मीडियावर शेअर केले.