ज्येष्ठ नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांना दणका, सरकार आणणार नवा कायदा

Feb 24, 2021, 21:15 PM IST
1/5

तुम्ही कुणाचा मुलगा, मुलगी, सून, जावई असाल, तर इकडे नीट लक्ष द्या. आता तुम्हाला सगळ्यांंना विशेषतः जावई आणि नातवंडांनाही ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देणं बंधनकारक असणार आहे. केंद्र सरकार तसा नवा कायदाच आणतंय.

2/5

कुणी घर देता का घर, असं म्हणणा-या अप्पा बेलवलकरांचं दुःखं कुणाच्या वाट्याला येऊ नये, म्हणून केंद्र सरकार संसदेत नवं बिल आणण्याच्या तयारीत आहे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना नीट सांभाळता ना ? आणि सासू-सास-यांकडेही नीट लक्ष देता ना, कारण आता आई-वडील, सासू सास-यांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं 

3/5

जावई, सून, दत्तक किंवा सावत्र मूल यांना अपत्य म्हणून गृहीत धरलं जाणार आहे. तसंच नात-नातू किंवा नातेवाईकांमधूनच दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलाचे आई वडीलही अपत्य व्याख्येत बसणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी याचं स्वागत केलं आहे. लवकरच हे सुधारित बिल संसदेत मांडलं जाणार आहे. 

4/5

दोन वर्षांपूर्वी यासंदर्भातलं बिल लोकसभेत सादर झालं आहे. माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण (दुरुस्ती) विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. आता त्यात दुरुस्ती होणार आहे. थोडतक्यात अपत्य या शब्दाची व्याख्या बदलणार आहे

5/5

याआधी मुलगा आणि मुलीवर आई वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी होतीच. पण आता सून आणि जावयालाही तसंच नात किंवा नातीलाही ज्येष्ठ नागरिकांना सांभाळावं लागणार आहे. घरातल्या ज्येष्ठांना सांभाळा. त्यांची काळजी घ्या.