295 डबे, 6 इंजिन अन् 11.20 तासांचा प्रवास; भारतातील 'या' राज्यात धावते देशातील सर्वात लांब ट्रेन

Longest Train of India: भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. जगातील निवडक सर्वात लांब प्लॅटफॉर्ममध्ये भारतीय रेल्वेचाही विक्रम आहे. 

| Aug 23, 2024, 18:04 PM IST
1/6

सर्वात लांब ट्रेन

भारतीय रेल्वेमध्ये प्रवासी गाड्या आणि हाय-स्पीड वंदे भारत यांचाही समावेश आहे. दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पावरही सरकार वेगाने काम करत आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की देशातील सर्वात लांब ट्रेन कोणती आहे? ही ट्रेन इतकी लांब आहे की त्याचे डबे मोजताना तुम्ही थकून जाल. 

2/6

सर्वात उंच रेल्वे पूल

भारतीय रेल्वे अंतर्गत दररोज 13 हजारहून अधिक गाड्या धावतात. यामध्ये रोज 4 कोटींहून अधिक प्रवासी एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकात प्रवास करतात. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतीय रेल्वेच्या नेटवर्कमध्ये आहे. ज्यावेळी या पुलावरून ट्रेन जाते तेव्हा वेगळाच अनुभव येतो. 

3/6

सुपर वासुकी

भारतीय रेल्वेची सर्वात लांब ट्रेन 3.5 किमी लांबीची आहे. या ट्रेनचे डबे एका बाजूने मोजायला सुरुवात केली तर डोळे थकतील पण रेल्वेचे डबे मोजण्याचे काम संपणार नाही. 'सुपर वासुकी' असे या ट्रेनचे नाव आहे. या ट्रेनला 295 डबे आहेत. 

4/6

सहा इंजिन

सुपर वासुकी या ट्रेनला एकूण सहा इंजिन आहेत. त्यामुळे 295 डबे असणाऱ्या या ट्रेनला जेव्हा रेल्वे क्रॉसिंगवरून जाताना बराच वेळ लागतो. सुपर वासुकी ही रेल्वेची मालगाडी आहे. 

5/6

27 हजार टन कोळसा

सुपर वासुकीच्या माध्यमातून देशाच्या विविध खाणींमधून काढलेला कोळसा वीज प्रकल्पांपर्यंत पोहोचवला जातो. ही ट्रेन छत्तीसगडमधील कोरबा ते नागपुरातील राजनांदगावपर्यंत एकाच वेळी 27 हजार टन कोळसा घेऊन जाते. 

6/6

11.20 तास प्रवास

या मालगाडीला नागपुरातील कोरबा ते राजनांदगाव हे अंतर पार करण्यासाठी तब्बल 11.20 तास लागतात. भगवान शंकराच्या गळ्याभोवती असलेल्या वासुकी नागाच्या नावावरून या ट्रेनला हे नाव देण्यात आलं आहे. ही मालगाडी पाहणाऱ्या व्यक्तीला सापासारखी दिसते.