'हे' 7 चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाले पाहिजेत, थिएटरबाहेर होईल प्रचंड गर्दी

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्याची चाहते पुन्हा एकदा प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. यामध्ये राजकीय ड्रामा ते रोमँटिक चित्रपटांचा समावेश आहे. जाणून घ्या सविस्तर 

| Sep 07, 2024, 16:24 PM IST
1/8

हिट चित्रपट

बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक चित्रपट सध्या प्रदर्शित होत आहेत. अलीकडेच आर. माधनव, सैफ अली खान यांचा 'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 

2/8

दिल से

शाहरुख खानचा 1998 मध्ये प्रदर्शित झालेला 'दिल से' चित्रपट आजही लोकांच्या ह्रदयात आहे. या चित्रपटातील गाणी किंवा शाहरुख खानचा अभिनय, लोक कधीच ते विसरु शकत नाहीत.

3/8

युवा

2004 मध्ये 'युवा' हा राजकीय ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगन, अभिषेक बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांनी अशा भूमिका साकारल्या होत्या ते प्रेक्षक कधीच विसरू शकत नाहीत. हा प्रचंड मनोरंजन करणारा चित्रपट होता. 

4/8

कभी खुशी कभी ग़म

'कभी खुशी कभी ग़म' या चित्रपटातील पूजाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. अशा परिस्थितीत त्यांना हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केल्यास गदारोळ होईल. 

5/8

शोले

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा 'शोले' हा चित्रपट देखील खूप हिट ठरला. जर पुन्हा एकदा 'शोले' चित्रपट प्रदर्शित झाला तर थिएटरबाहेर प्रचंड गर्दी होऊ शकते. या चित्रपटातील प्रत्येक पात्राला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे.   

6/8

येस बॉस

शाहरुख खान आणि जुही चावलाचा 'येस बॉस' हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. अजूनही या चित्रपटाची चाहत्यांमधील क्रेम कमी झालेली नाही. या चित्रपटातील काही क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

7/8

मास

2004 साली प्रदर्शित झालेला 'मास' हा चित्रपट देखील प्रचंड हिट ठरला होता. या चित्रपटात नागार्जुनने महत्वाची भूमिका साकारली होती. नागार्जुनच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट आहे. 

8/8

इंद्रा द टाइगर

2002 मध्ये 'इंद्रा द टाइगर' हा भारतीय तेलुगु-भाषेतील अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. 10 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाने 55 कोटींहून अधिक कमाई केली होती.