हा शुक्रवार असेल तुमच्यासाठी धमाकेदार; मराठी-हिंदी चित्रपटांची मिळणार अस्सल मेजवानी

5 Movies Releasing on This Friday: येता शुक्रवार हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास असणार आहे. तेव्हा येत्या शुक्रवारी एक, दोन नव्हे तर चक्क पाच चित्रपट प्रदर्शित होत आहेत तेव्हा चला तर मग जाणून घेऊया या पाच चित्रपटांविषयी. 

| May 31, 2023, 20:37 PM IST

5 Movies Releasing on This Friday: आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते की शुक्रवार कधी येतोय आणि आपण कधी एकदा फॅमिलीसोबत अथवा फ्रेंड्ससोबत नव्या पिक्चरला जातो आहोत. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की येत्या शुक्रवारी तुमच्यासाठी कोणत्या चित्रपटांची मेजवानी आहे. येत्या शुक्रवारी एकूण पाच मराठी आणि हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत त्यात मराठी चित्रपटांची संख्या जास्त आहे. 

1/5

मुंबईकर

mumbaikar

Vikrant Massey, विजय सेतूपती यांची भुमिका असणारा 'मुंबईकर' हा चित्रपट येत्या 2 जूनला जिओ सिनेमावर प्रदर्शित होतो आहे. हा चित्रपट तुम्हाला मोफत पाहता येईल. (Photo: Social Media)

2/5

जरा हटके जरा बचके

jara hatke jara bachke

विकी कौशल आणि सारा अली खानची प्रमुख भुमिका असणारा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट येत्या 2 तारखेला प्रदर्शित होतो आहे. (Photo: Social Media)

3/5

बटरफ्लाय

butterfly marathi movie

मधुरा वेलणकर, अभिजित साटम, महेश मांजरेकर, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर आणि अन्य दिग्गज कलाकारांनी समृद्ध असा बटरफ्लाय हा मराठी चित्रपट 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेत्री मधुरा वेलणकरची सख्खी बहीण मीरा वेलणकर हिनं केलं आहे. (Photo: Social Media)

4/5

चौक

chowk

उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, किरण गायकवाड अशा कलाकारांची भुमिका असणारा 'चौक' हा आगळवेगळा चित्रपट येत्या शुक्रवारीच प्रदर्शित होतो आहे. (Photo: Social Media)

5/5

फकाट

fakaat marathi movie

'फकाट' हा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. यात हेमंत ढोमे, रसिका सुनील अशांच्या भुमिका आहेत. (Photo: Social Media)