एसी सुरु करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात; नाही तर होऊ शकतो स्फोट

सध्या उकाड्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. त्यामुळे अनेक जण थंडावा मिळवण्यासाठी एसी, पंखा, कुलर यांच्यासारख्या उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. उकाड्यापासून सुटका करण्यासाठी अनेक ठिकाणी एसीचा सर्रास वापर करण्यात येत आहे. मात्र या एसीच्या वापराबाबत योग्य माहिती नसल्याने अनेक अपघात देखील झाल्याचे समोर आले आहे.

Jun 05, 2023, 19:28 PM IST
1/5

AC blast

अमेरिकेत एसीच्या स्फोटामुळे झालेल्या दुर्घटने 29 लोक ठार झाले आणि 200 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले. पण एसीला आग कशी लागू असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. एका छोट्याशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते.

2/5

AC serving

एअर कंडिशनरला आग लागण्याचे मुख्य कारण नियमित सर्व्हिस न करणे हे असू शकते. यामुळे एअर कंडिशनरच्या भागांमध्ये धूळ साचते आणि त्यामुळे त्यांना जास्त उष्णता घ्यावी लागते. जास्त उष्णतेमुळे एअर कंडिशनरमध्ये समस्या उद्भवू शकतात आणि आग लागण्याचा धोका वाढू शकतो.

3/5

AC Fire

एअर कंडिशनरजवळ असलेल्या कागद, पाने आणि कचऱ्याचे ढीग यामुळे आग लागण्याची शक्यता असते. कारण एसी बराच वेळ वापरल्याने त्याच्यातून मागे गरम हवा सोडली जाते आणि यामुळे कागद, कचरा पेटू शकतात.

4/5

AC Part

एअर कंडिशनरमध्ये कोणताही नवीन पार्ट लावण्यापूर्वी, तुम्ही ते तपासून घेतले पाहिजेत. चुकून एसीमध्ये कोणताही बनावट पार्ट बसवला तर अपघात होऊ शकतो. यामुळे एअर कंडिशनर हळूहळू चालू लागतो आणि शेवटी काम करणे थांबवतो.

5/5

keep serving on time AC

एअर कंडिशनर योग्यरित्या स्वच्छता न केल्यामुळे एअर व्हेंट्स, फिल्टर, कॉइल आणि पंख्यामध्ये घाण आणि धूळीचे कण जमा होतात. ही साचलेली धूळ आणि घाण सामान्यत: हवेचा सामान्य प्रवाह रोखतात, परिणामी एसीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि शेवटी आग लागण्याचा धोका वाढतो.