रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

Nov 14, 2019, 14:46 PM IST
1/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

'पानिपत' या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ६ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं कथानक आणि त्यासाठी निवड करण्यात आलेले कलाकार या उत्सुकतेमागचं मुख्य कारण ठरत आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी या चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज घेत अगदी पेशवाईपासून ते अफगाण शासकांपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या पात्राची तितकेच बारकावे टीपत निवड केली आहे. अर्जुन कपूर, क्रिती सेनन यांच्यासह बऱ्याच मराठी कलाकारांनाही पानिपतच्या निमित्ताने एका वेगळ्या रुपात पाहता येणार आहे. चला तर मग नजर टाकूया रुपेरी पडद्यावर पानिपत घडवणाऱ्या या चेहऱ्यांवर.... 

2/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

'पानिपत'मध्ये अभिनेता अर्जुन कपूर हा सदाशिव रावांच्या भूमिकेत झळकणार आहे. 

3/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

पार्वती बाई साकारण्याची जबाबदारी अभिनेत्री क्रिती सेनन हिने निभावली आहे. 

4/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

अभिनेता संजय दत्त चित्रपटात अहमद शाह अब्दालीच्या रुपात झळकेल.

5/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

चित्रपटात ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी हे मल्हार राव होळकर यांच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतील. 

6/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

गश्मीर महाजनीसुद्धा या चित्रपटात एका महत्त्वाच्या म्हणजेच जनकोजी शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल. 

7/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

अभिनेता मोनिष बहल 'पानिपत'मध्ये नानासाहेब पेशवे यांच्या रुपात दिसेल. 

8/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे या गोपिका बाईंच्या भूमिकेत दिसतील. 

9/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

बाजीराव आणि मस्तानीच्या मुलाच्या म्हणजेच समशेर बहाद्दरच्या भूमिकेत अभिनेता साहिल सलथिया झळकणार आहे. 

10/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

शुजा-उद- दौला ही भूमिका साकारण्यासाठी चित्रपटात कुणाल कपूर यांची वर्णी लागली आहे. 

11/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

विश्वासरावांच्या भूमिकेसाठी अभिषेक निगम याची निवड करण्यात आली आहे. 

12/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

इब्राहिम खान गर्दीच्या निमित्ताने अभिनेता नवाब शाह पुन्हा एकदा एका प्रभावी लूकमध्ये दिसत आहे. 

13/13

रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे

अभिनेता मंत्रा पानिपतमध्ये नजिब -उद-दौला या भूमिकेत दिसेल. अशी एकंदर स्टारकास्ट पाहता रुपेरी पडद्यावरचं हे 'पानिपत' कोणते परिणाम करुन जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (सर्व छायाचित्रे- फेसबुक/ क्रिती सेनन)