Pitru Paksha 2023 : पितृपक्षात अशी स्वप्नं दिसणं म्हणजे शुभ संकेत! पण ही स्वप्नं असतात संकटांचा इशारा

Pitru Paksha 2023 : अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष पंधरवड्याला सुरुवात होते आहे. जर या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला स्वप्नात पूर्वज दिसले तर हे शुभ आहे की अशुभ समजून घ्या. 

Sep 27, 2023, 12:49 PM IST

Pitru Paksha 2023 :  अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून 29 सप्टेंबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असणार आहे. या काळात जर तुमच्या स्वप्नात पूर्वज आले तर याचा अर्थ आहे का? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहात.

1/12

स्वप्नात पितरांना पाहण्याचा अर्थ काय? हा अशुभ संकेत आहे की शुभ याबद्दल स्वप्न शास्त्र काय सांगते जाणून घेणार आहात.

2/12

तुम्हाला स्वप्नात पूर्वज शांत दिसत तर त्यांना कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती हवी आहे, असं संकेत देतात. त्यामुळे पितृपक्षात त्यांची धार्मिक पूजा, श्राद्ध, तर्पण, पिंडदान करा. 

3/12

जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालताना दिसले तर हे अतिशय शुभ संकेत मानले जाते. या अर्थ पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत. तुम्हला आनंदाची बातमी मिळणार आहे. 

4/12

स्वप्नात पूर्वज केस विंचरताना दिसले तर हे शुभ संकेत आहे, त्यावरील सर्व संकट नाहीसे होणार आहे. 

5/12

स्वप्नात पूर्व वारंवार दिसत असेल तर अशुभ संकेत मानले जाते. या अर्थ पूर्वज अशांत आहेत. त्यामुळे पितृपक्ष काळात पिंडदान किंवा तर्पण करावे. त्यांच्या आवडत्या गोष्टींचं दान करावे. 

6/12

स्वप्नात पूर्वजाना कष्टात पाहणे म्हणजे हे अशुभ संकेत आहे. याचा अर्थ येणाऱ्या काळात घरावर संकट कोसळून शकतं. त्यामुळे पितृपक्ष काळात अन्न आणि पाण्याचे दान करा.

7/12

स्वप्नात यमदूत पाहणे हे अशुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ पूर्वज नाराज असून पितृ पक्षात विधी आणि अन्न, पाणी दान करा. 

8/12

स्वप्नात पूर्वज रडताना दिसले तर हे अशुभ मानले जाते. याचा अर्थ त्या पूर्वजाला मोक्ष प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पितृपक्ष काळात विधी करुन घ्या. 

9/12

पितृपक्ष काळात तुम्ही स्वप्नात वारंवार मुलांना आजारी पाहत असेल तर हे अशुभ संकेत मानलं जाते. याचा अर्थ पूर्वज तुमच्यावर चिडले आहेत. त्याशिवाय येत्या काळात तुमच्यावर अडचणीचं डोंगर कोसळणार आहे. 

10/12

पितृपक्ष काळात वारंवार वाइट स्वप्ने पडणे, म्हणजे पूर्वज तुमच्या वागण्यावर खुश नसल्याचे लक्षण मानले जाते. 

11/12

जर स्वप्नात कावळा चोच मारताना दिसला तर भविष्यात अप्रिय घटना घडण्याचे संकेत आहे. पूर्वज तुमच्यावर रागावले असून तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे ते दुखावले आहेत. अशावेळी पोळी पाण्यात टाकून कावळ्यासाठी छतावर ठेवा. 

12/12

पितृपक्ष दरम्यान स्वप्नात जर कुत्रा चावला तर हे अशुभ मानले जाते. या स्वप्नाचे दोन अर्थ असू शकतात, एक पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत, दुसरं कुंडलीतील राहूची स्थिती कमजोर झाली आहे.