Cleaning Tips: याच त्या बेस्ट 5 ट्रिक्स, लगेच स्वच्छ करा तुमचा चष्मा

Specs Glass : चष्मा वापरताना अनेकजन त्याची काळजी घेत नाहीत. चष्म्याची काच साफ करताना असं काय कारावं म्हणजे चष्मा ही चांगला राहील आणि त्याची काच ही स्वच्छ राहील, यासाठी आज आम्ही काही ट्रिक्स सांगणार आहोत.

Aug 24, 2022, 15:25 PM IST
1/5

विच हेझेलने चष्मा स्वच्छ करा

तुम्हाला तुमचा चष्मा स्वच्छ करायचा असेल तर त्यासाठी अर्धा कप डिस्टिल्ड पाण्यात अर्धा कप विच हेझेल मिसळा. हे लिक्विड स्प्रे बाटलीत भरून ठेवा. आता चष्म्याच्या लेन्सवर स्प्रे करा आणि मायक्रोफायबर कपड्याने लेन्स पूर्णपणे पुसून टाका. तुमचा चष्मा पूर्णपणे स्वच्छ झाल्याचं तुम्हाला दिसेल.

2/5

गरम पाणी आणि लिक्विड साबण

चष्मा स्वच्छ करताना ते थंड पाण्याने धुणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. तुम्ही अर्धा कप कोमट पाण्यात लिक्विड सोपचे काही थेंब मिसळा. आता हे लिक्विड चष्म्याच्या लेन्सवर लावा. त्यानंतर स्वच्छ मऊ कापडाने पुसून टाका.

3/5

व्हिनेगर वापरा

चष्मा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर देखील वापरू शकता. यासाठी पाण्यात थोडे व्हिनेगर टाका. हे लिक्विड स्प्रे बाटलीत भरा. हे लिक्विड चष्म्याच्या लेन्सवर फवारावे. यानंतर सूती किंवा मायक्रोफायबर कापडाने पुसून टाका.

4/5

अल्कोहोलच्या मदतीने चष्मा साफ करा

अल्कोहोलच्या मदतीने चष्मा देखील साफ केला जाऊ शकतो. यासाठी पाण्यात अल्कोहोलचे काही थेंब मिसळा. या लिक्विडमध्ये डिशवॉश लिक्विडचे काही थेंब देखील घाला. हे संपूर्ण मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून चष्म्याच्या लेन्सवर स्प्रे करा. आता कापडाच्या मदतीने स्वच्छ करा.

5/5

ग्लास क्लीनर वापरू नका

चष्मा साफ करताना लक्षात ठेवा की केवळ चष्म्याच्या लेन्सच नाही तर संपूर्ण चष्मा स्वच्छ केला पाहिजे. चष्म्यावर सॅनिटायझर लावू नका, लगेच पुसून टाका, नाहीतर डाग राहतील. चष्मा स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ग्लास क्लीनर वापरू नका कारण ते सामान्य काच स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात.