जाणून घ्या सेलिब्रिटींच्या टॅटू मागील रहस्य

सध्या बॉलिवूडमध्ये वेग-वेगळ्या टॅटूंचं ट्रेन्ड... 

Mar 25, 2021, 08:51 AM IST

बॉलिवूडमध्ये अनेकांनी टॅटू केलं आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं टॅटू पाहून चाहते देखील त्यांच्या प्रमाणे टॅटू करतात. पण तुम्हाला सेलिब्रिटींच्या टॅटू मागील नक्की रहस्य काय आहे, हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेवू सेलिब्रिटींच्या टॅटू मागील रहस्य...

1/5

अभिनेत्री प्रियंका चोप्रा

अभिनेत्री प्रियंका चोप्रा

प्रियंकाने तिच्या वडिलांसाठी मनघटावर 'डॅडीस लिल गर्ल' म्हणून टॅटू केलं आहे. 

2/5

अभिनेता अक्षय कुमार

 अभिनेता अक्षय कुमार

अक्षय कुमारने त्याच्या पत्नीच्या नावाचं टॅटू करत, पत्नीबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. शिवाय त्याने मुलगी नितारा आणि मुलगाच्या नावाचं देखील टॅटू केलं आहे. 

3/5

अभिनेत्री दीपिका पादूकोन

अभिनेत्री दीपिका पादूकोन

दीपिका आणि अभिनेता रणबीर कपूर रिलेशनशीपमध्ये होते, तेव्हा दीपिकाने  'आरके' म्हणून टॅटू केलं. परंतु आता तिने टॅटूची डिझाईन बदलली आहे. शिवाय तिने पायावर देखील टॅटू केलं आहे. 

4/5

अभिनेता सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खान

सैफ अली खानने पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खानच्या नावाचं टॅटू केलं आहे. करीना आणि सैफला दोन मुलं आहेत. 

5/5

अभिनेता वरूण धवन

अभिनेता वरूण धवन

वरूणने कानाच्या मागे '24' असं टॅटू केलं आहे. मात्र अद्याप त्याने या टॅटूचा अर्थ सांगितला नाही.