समाजात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी करा 'हे' 10 बदल, किंमत आपोआप वाढेल
Life Changing Rule : प्रत्येकाला स्वतःचं समाजात वेगळं स्थानं असावं असं वाटत असतं. पण अशावेळी नेमकं काय करावं, हे कळत नाही. जीवनातील 10 महत्त्वाचे बदल तुम्हाला वेगळं स्थान निर्माण करण्यास मदत करतील.
समाजात जगत असताना आपण आपल्या आजूबाजूला अशी लोकं पाहतो, ज्यांना अजिबात किंमत नसते. त्या व्यक्तींचं अस्तित्व कुणीच अधोरेखित करत नाही. अशावेळी काय करावं? हा प्रश्न पडतो. स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा जगात आपली किंमत वाढवण्यासाठी 10 नियम किंवा बदल अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.