Top Airports In The World : 'ही' आहेत जगातील सगळ्यात सुंदर 5 विमानतळं, भारतातील विमानतळाचाही समावेश

Top Airports In The World : स्काईट्रैक्स वर्ल्ड एयरपोर्ट अवॉर्ड्स 2023 जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये जगातील सगळ्यात चांगल्या विमानतळाविषयी सांगण्यात आलं आहे. तर नंबर एकला कोणतं विमानतळ आहे हे जाणून घेऊया... सिंगापुरला चांगी विमानतळामुळे सर्वोर्च्च विमानतळाचा खिताब मिळाला आहे. 

Mar 18, 2023, 18:20 PM IST
1/6

Top Airports In The World

सिंगापुरच्या चांगी विमानतळानं दोहा विमानतळाला पछाडलं आहे. (Singapore's Changi Airport) चांगी विमानतळाला या यादीत पहिलं स्थान मिळालं आहे. 

2/6

Top Airports In The World

दोहाच्या हमद विमानतळाला (Hamad International Airport) या लिस्टमध्ये दुसरेस्थान मिळाले आहे. हमदच्या विकासाविषयी बोलायचे झाले तर कतार एअरवेजनं यासाठी मोठी गुंतवणूक केली होती. सरकारनं या विमानतळासाठी मोठी गुंतवणूक केली होती. 

3/6

Top Airports In The World

जपानची राजधानी टोकियो येथे असलेल्या हनेडा विमानतळाला (Henda Airport In Japan) तिसरे स्थान मिळाले आहे. हे विमानतळ सुविधांच्या बाबतीत ग्रेटर टोकियोमधील सर्वोत्तम विमानतळ मानले जाते. 

4/6

Top Airports In The World

दक्षिण कोरियाच्या इंचेऑन आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Incheon International Airport) चौथे स्थान देण्यात आले आहे. हे दक्षिण कोरियामधील सर्वात मोठे विमानतळ आहे. फक्त इतकंच नाही तर जगातील सगळ्यात मोठ्या विमानतळाच्या यादीत याचा समावेश आहे. 

5/6

Top Airports In The World

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील चार्ल्स डी गॉल विमानतळाला 5 वे स्थान मिळाले आहे. (Charles de Gaull Airport in Paris) 

6/6

Top Airports In The World

या यादित भारतातील फक्त इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGIA) टॉप 50 मध्ये समाविष्ट आहे. या यादीत हे विमानतळाला 36 व्या स्थान मिळाले आहे. (Indira Gandhi International Airport)