Homestay काय आहे? पर्यटनासाठी जाताना 'हा' पर्याय फायदेशीर

Jan 16, 2021, 14:50 PM IST
1/8

काय आहे होमस्टे

काय आहे होमस्टे

होमस्टे (Homestay) पर्यटकांना राहण्याचा एक उत्तम पर्याय. पर्यटकांसाठी एक असं हॉटेल जेथे तुम्ही लोकल घराचा अनुभव घ्याल. अनेक ठिकाणी ट्रॅव्हल्स Homestay चा पर्याय उपलब्ध आहे. Homestay मधून तुम्ही तेथील पर्यटनाला अतिशय जवळून अनुभवू शकता. येथे तुम्हाला एका बंगल्यापासून अगदी झोपडीपर्यंत अनुभव घेऊ शकता.

2/8

भारताच्या संस्कृतीशी जोडले जाल

भारताच्या संस्कृतीशी जोडले जाल

भारत विविधतेचा देश आहे. येथील राहणीमान, संस्कृती, पेहराव आणि खाद्य संस्कृतीत वेगळेपण आहे. एक एक किलोमीटवर संस्कृती बदलत आहे. अशावेळी फिरायला जाताना तुम्हाला या सगळयाचा अनुभव घ्यायचा आहे. 

3/8

मिळेल मनासारखं, घरचं जेवण

मिळेल मनासारखं, घरचं जेवण

होमस्टेचं वेगळंपण असं आहे की तेथे खूप मोठा मेन्यू नसतो. पण तेथे तुम्हाला अगदी लोकल फूड खायला मिळेल. होमस्टेचं हे वेगळेपण आहे. तुम्हाला तेथील जेवण नक्की आवडेल. 

4/8

ऍक्टिव्हिटिजमध्ये रमेल मन

ऍक्टिव्हिटिजमध्ये रमेल मन

हॉटेलमध्ये अनेकदा इव्हिनिंग पार्टीचं आयोजन असायचंय पण तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल तर होमस्टे उत्तम पर्याय आहे. तेथील तुम्हाला स्टाफ अतिशय कम्फर्टेबल करतात. 

5/8

खर्च अगदी तुमच्या खिशाला परवडेल असा

खर्च अगदी तुमच्या खिशाला परवडेल असा

जर तुम्हाला कमी खर्चात फाइव स्टार हॉटेलचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला होमस्टे हा उत्तम पर्याय आहे. हल्ली अनेकदा टूरिस्ट प्लेसजवळ होमस्टेचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेथे राहू शकतात. 

6/8

सुरक्षेचा पूर्ण विश्वास

सुरक्षेचा पूर्ण विश्वास

हॉटेलमध्ये राहणं कायमच सुरक्षित असतं असं नाही. ट्रिप दरम्यान तुम्ही सेफ्टीचा विचार करत असाल तर होमस्टेमध्ये राहणं हे अतिशय विश्वासाचं आहे. होमस्टे देखील खूप प्रकारचे असतात. काही ठिकाणी तुम्ही एकटे राहता तर काही ठिकाणी तुम्ही काही अनोळखी लोकांसोबत राहतात. आपल्या आवडीनुसार तुम्ही जागा निवडू शकतो. 

7/8

हटके जागा अनुभवण्याची संधी

हटके जागा अनुभवण्याची संधी

होमस्टेमध्ये राहण्याचा महत्वाचा फायदा असा की, होस्ट ते डेस्टिनेशनपर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळते. या ठिकाणी खूपच कमी लोकं फिरतात. कारण तुमचे होस्ट वेगळे आहेत.   

8/8

उत्सवाचा पुरेपुर आनंद लुटा

उत्सवाचा पुरेपुर आनंद लुटा

जर तुम्ही कधी उत्सवाच्या किंवा सणाच्या दिवसांत पर्यटनासाठी जात असाल. तर होमस्टे (Homestay) हा एक उत्तम पर्याय आहे. कारण या ठिकाणी तुम्ही पर्यटनासोबतच सणाचा आनंद देखील लुटू शकतात. या ठिकाणी तुम्ही अतिशय कौटुंबिक वातावरण अनुभवाल.