Tulsi Vivah Invitation Marathi Card : तुळशीच्या लग्नाचं खास आमंत्रण पारंपरिक आणि तरीही हटके
Tulsi Vivah Invitation in Marathi : कार्तिकी एकादशीनंतर तुळशीच्या लग्नाची लगबग सुरु होते. यानंतर घरातील विवाह सोहळे संपन्न होण्याची रीत आहे. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये हा अतिशय पवित्र संस्कार समजला जातो.
Tulsi Vivah Invitation Card in Marathi: महाराष्ट्रात दिवाळी हा अतिशय आनंदाने उत्सवाने साजरा केला जाणारा सण आहे. दिवाळीची सांगता देव उठनी एकादशीनंतर द्वादशीला तुळशीचं लग्न लावून केली जाते. यंदा तुलसी विवाह आरंभ 24 नोव्हेंबर रोजी होणार असून 27 नोव्हेंबर तुलसी विवाह समाप्ती होणार आहे. हिंदू धर्मात तुळशीचं लग्न शाळीग्रामसोबत लावलं जातं. एखाद्या लग्नसोहळ्याप्रमाणे तुळशीचं लग्न आनंदात, उत्साहात आणि धुमधडाक्यात लावलं जातं. किशोरवयीन मुलगा नवरदेव म्हणून उभा करून तिन्ही सांजेला हा सोहळा होतो. या लग्नाला अगदी जवळच्या मंडळींना, आप्तेष्टांना आणि नातेवाईंकाना आमंत्रण दिलं जातं. यासाठी तुम्हाला आमंत्रण पत्रिका पाठवायची असेल तर खालील नमुने नक्कीच मदत करतील.