प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन दिवस ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Pune Expressway Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून वाहतूकदारांच्या सोयीसाठी राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. त्याअंतर्गत दोन दिवसासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Apr 03, 2024, 16:34 PM IST
1/7

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही महत्त्वाची अपडेट आहे. राज्यातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यावर आज आणि उद्या 2 दिवसांचा मेगाब्लॉक असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या मार्गावरील वाहतूक वळवली आहे.   

2/7

वाहतूकदारांच्या सोयीसाठी राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. त्याअंतर्गत गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर नवीन यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. 

3/7

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. या कारणास्तव या मार्गावर दोन दिवसीय  ब्लॉक घेण्यात येत आहेत. 

4/7

त्यानुसार वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेने काम करण्यासाठी कि.मी. 93/900 दरम्यान, आज म्हणजेच 3 एप्रिल आणि उद्या म्हणजेच 4 एप्रिल 2024 दरम्यान, दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.

5/7

 या वेळेत गॅन्ट्री बसवली जाईल. गॅन्ट्री बसण्यासाठी मुंबई आणि पुणे कॉरिडॉरवरील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

6/7

त्यामुळे मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. या  मार्गाहून पुण्याहुन, मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किवळे पुलावरून मुंबई-पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळवली जातात. 

7/7

तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाक्यावरून (लोणावळा एक्झिट) म्हणजेच मुंबई-पुणे मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहेत.  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहतूकदारांना रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.