'इथं' 30 हजारांच्या पगारावर भरावा लागतो 18 हजारांचा Income Tax; सर्वाधिक कर आकारणारे 10 देश

Countries With Highest Personal Income Tax: अर्थसंकल्प म्हटल्यानंतर भारतीयांना सर्वात आधी आठवणारी गोष्ट म्हणजे आयकर अर्थात इनकम टॅक्स. भारतामध्ये अगदी 5 टक्क्यापासून 15 टक्क्यांपर्यंत आयकर आकारला जातो. मात्र जगातील सर्वाधिक आयकर आकराणारे देश कोणते हे तुम्हाला ठाऊक आहे का? अर्थसंकल्प 2024 च्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील अव्वल 10 देश आणि तेथील लोक किती आयकर भरतात याबद्दल...

| Feb 01, 2024, 09:26 AM IST
1/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

वैयक्तिक उत्पन्नावरील करांवर अर्थसंकल्पामध्ये किती सूट मिळते इथपुरताच बजेटशी संबंध असलेल्या भारतीयांची संख्या कमी नाही. त्यामुळेच आयकर हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. 

2/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

भारतात वैयक्तिक आयकराची टक्केवारी 5 ते 15 दरम्यान असली तरी जगात असेही देश आहेत जिथे ही टक्केवारी 50 हून अधिक आहे. म्हणजेच कमवलेल्या पैशांपैकी अर्धा पैसा आयकर म्हणून भरावा लागतो. असे देश कोणते आणि तिथे कर किती आहे पाहूयात...

3/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

स्लोव्हेनिया - सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या अव्वल 10 देशांमध्ये स्लोव्हेनिया हा देश दहाव्या क्रमांकावर आहे. या देशातील नागरिकांना कमाईच्या अर्धी रक्कम म्हणजेच 50 टक्के आयकर भरावा लागतो. 

4/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

इस्रायल - भारताचा मित्र देश असलेल्या इस्रायलमध्येही आयकर तब्बल 50 टक्के इतका आहे. इस्रायल सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत नवव्या स्थानी आहे. 

5/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

बेल्जियम - युरोपमधील आघाडीच्या प्रगत देशांपैकी एक असलेल्या बेल्जियममध्ये कमाईच्या अर्धी रक्कम नागरिकांना आयकर म्हणून द्यावी लागते. इथला इनकम टॅक्स 50 टक्के इतका आहे. बेल्जियम या यादीत आठव्या स्थानी आहे. 

6/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

अरुबा - कॅरेबियन समुद्रामध्ये नेदरलॅण्ड किंग्डममध्ये असलेल्या या बेटवजा देशातील आयकर तब्बल 52 टक्के इतका आहे. म्हणजेच 100 रुपये कमाई असेल तर 52 रुपये सरकारला द्यावे लागतात. हा देश सर्वाधिक आयकर असलेल्या देशांच्या यादीत सातव्या स्थानी आहे. 

7/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

स्वीडन - सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीमध्ये स्वीडनचाही समावेश आहे. या देशातील नागरिकांना कमाईच्या 52.90 टक्के रक्कम इनकम टॅक्स म्हणून भरावी लागते. स्वीडन सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. 

8/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

ऑस्ट्रिया - सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत ऑस्ट्रिया हा युरोपीयन देश पाचव्या स्थानी आहे. या देशातील आयकर तब्बल 55 टक्के इतका आहे.  

9/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

डेन्मार्क - युरोपामधील सर्वात सामाधानी आयुष्यमान असलेल्या या देशातील इनकम टॅक्स तब्बल 55.90 टक्के इतका आहे. डेन्मार्क हा सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकाचा देश आहे.  

10/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

जपान - जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या जपानमधील पर्सनल इनकम टॅक्स 55.97 टक्के इतका आहे. सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या टॉप 3 यादीत जपान आहे.   

11/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

फिनलॅण्ड - युरोपमधील या देशातील नागरिकांकडून तब्बल 56.95 टक्के आयकर आकारला जातो. हा कोणत्याही देशाकडून आकारला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आयकर आहे.  

12/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

आयव्हरी कोस्ट- पश्चिम आफ्रिकेमधील या देशामध्ये वैयक्तिक आयकर तब्बल 60 टक्के इतका आहे. जगात इतर कोणत्याही देशात इतका आयकर आकारला जात नाही. आयव्हरी कोस्ट हा सर्वाधिक आयकर आकारणारा देश आहे.

13/13

Union Budget 2024 Updates Top 10 Countries with the Highest Personal Income Tax Rates

ही पाहा सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या अव्वल 10 देशांची यादी.