केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन!

Lalbaghcha raja In mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले. 

Sep 23, 2023, 17:15 PM IST

Amit Shah took darshan of the Lalbaghcha raja : अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते.

1/8

शाल आणि श्रीफळ

अमित शहांना शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच या प्रसंगाची आठवण म्हणून त्यांना गणेशाची अतिशय सुंदर मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.

2/8

गणपतीची मुर्ती

मुंबई दौऱ्यावर असेल्या अमित शहा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपतीची मुर्ती भेट दिली.

3/8

वर्षा निवासस्थानी

गृहमंत्री अमित शाह यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली अन् गणपतीचं दर्शन घेतलं.

4/8

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आगमन झाले. 

5/8

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

यावेळी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते.  

6/8

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

आमदार आशिष शेलार यांच्या पुढाकाराने वांद्रे विभागात सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दर्शन घेतलं. 

7/8

उपस्थिती

याप्रसंगी सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दिपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार ॲड. आशिष शेलार उपस्थित होते.  

8/8

लालबागचा राजा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अमित शाह दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात.