उत्तराखंडमध्ये बांध फुटला, पाहा कशी आहे १ दिवसानंतरची परिस्थिती

Feb 08, 2021, 10:53 AM IST
1/10

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ऋषी गंगा येथे रविवारी सकाळी 10 वाजता बांध फुटल्याने अचानक नद्यांच्या पातळीत वाढ झाली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

2/10

आतापर्यंत 14 लोकांचा मृतदेह सापडला आहे.

3/10

4/10

तपोवन डॅम जवळ बंद झालेली टनेल उघडण्यासाठी जवान काम करत आहेत.

5/10

चमोली पोलिसांनी म्हटलं की, आतापर्यंत 15 लोकांना रेस्क्यु करण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार 170 लोकं बेपत्ता आहेत.

6/10

चमोलीच्या तपोवन डॅम जवळ SDRF आणि ITBP चे जवान बचाव कार्यात लागले आहेत. लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

7/10

तपोवन डॅम जवळून टनेलमध्ये पोहोचण्यासाठी ITBP चे जवान खोदकाम करत आहे.

8/10

चमोलीच्या तपोवनमध्ये टनेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं मोठं आवाहन आहे. यासाठी डॉग स्कॉडची ही मदत घेतली जात आहे.

9/10

आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक कुमार पांडे यांनी म्हटलं की, आम्ही दुसऱ्या टनलसाठी सर्च ऑपरेशन आणखी वाढवलं आहे. येथे 30 लोकं अडकल्याची माहिती आहे. 300 जवान टनलमध्ये फसलेल्या लोकांना काढण्याचं काम करत आहे.  

10/10

जेसीबीच्या मदतीने टनलमध्ये जाण्यासाठी रस्ता तयार केला जात आहे. आतापर्यंत १५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.