Vastu tips : 'या' गोष्टी घरात ठेवाच; आर्थिक समस्या दूर होण्यास होते मदत

आपल्यापैकी अनेकांचं बँक खातं महिना संपण्यापूर्वीच रिकामं होतं. या लोकांवर नेहमीच काही ना काही कर्ज असतं. त्यांना इच्छा असूनही खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही. ज्योतिष्य शास्त्रानुसार, अशा परिस्थितीत काही खास गोष्टी घरात ठेवल्या तर आर्थिक समस्या दूर होऊ शकते.

Jun 17, 2023, 22:55 PM IST
1/5

लहान नारळ- लहान नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. असं म्हणतात की, ज्या घरांमध्ये छोटा नारळ ठेवला असतो व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता नसते.   

2/5

धातूचा कासव - तुम्ही अनेक घरांमध्ये चांदी, पितळ किंवा कांस्य कासव पाहिले असतील. कासव हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. कासव पाळल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. आर्थिक उन्नतीसाठी कासवाचं तोंड नेहमी उत्तरेकडे ठेवा

3/5

पिरॅमिड- वास्तुशास्त्रानुसार पिरॅमिड घरात ठेवल्याने आर्थिक समृद्धी वाढते. असं म्हणतात की, की ज्या घरात क्रिस्टल पिरॅमिड असतो तेथील सदस्यांचे उत्पन्न वेगाने वाढतं. 

4/5

गोमती चक्र- गोमती चक्राचे वर्णन शास्त्रात अतिशय शुभ मानले गेले आहे. गोमती चक्र हा गोमती नदीत सापडलेला चाकाच्या आकाराचा दगड आहे. हे चक्र घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि घरात सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी येते. 

5/5

कमलगट्टाचा हार - जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल तर कमलगट्टाची माळ आणून घरातील मंदिरात ठेवा. पैसे मिळवण्याचा मार्ग मोकळा करते या माळात तुमच्या प्रमुख देवतेचे नाव 108 वेळा जपावे.