'मिर्झापूर 2' चे इंटीमेट सीन्स कसे शूट झाले? विजय वर्मा म्हणाला, 'पार्टनरकडून...'

'मिर्झापूर 3' ही सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. लवकरच ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे जेव्हा पासून या सीरिजची घोषणा झाली, तेव्हा पासून सगळीकडे एकच चर्चा आहे ती 'मिर्झापूर 3'. तो येण्याआधी सगळीकडे काय पटकथा असणार किंवा आधीच्या सीरिजमधील काही गोष्टी या चर्चेत आहेत. 

| Jul 01, 2024, 14:09 PM IST
1/7

विजय वर्मा आणि श्वेता त्रिपाठीचे इंटीमेट सीन्स

या आधीच्या सीरिजमध्ये म्हणजेच 'मिर्झापूर 2' मध्ये विजय वर्मा आणि श्वेता त्रिपाठीसोबत इंटीमेट सीन्स दिले होते. आता सीझन 3 च्या प्रदर्शनाआधीच विजय वर्मानं या सीन्सच्या शूटिंगविषयी सांगितलं आहे. 

2/7

मुलाखतीत खुलासा

'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला, 'आपण आपल्या पार्टनरकडून बऱ्याच गोष्टी शिकतो. असं नाही की सगळ्या गोष्टी तुम्ही स्वत: डिस्कव्हर कराल.' 

3/7

तरुण ते पुरुष हा प्रवास

जेव्हा तुम्ही एका वेगळ्या एनर्जीत विलिन होता तेव्हा तुम्ही तरुणाचे पुरुष होता. सीनमधले काही गोष्टी सांगत तो म्हणतो की 'जेव्हा गोलू (श्वेता त्रिपाठी) छोटे त्यागी (विजय वर्मा) ला बेल्ट देऊन बोलते की मार, तर तो स्व:तला मारू लागतो. मी जेव्हा ही कल्पना दिली होती तेव्हा दिग्दर्शिक गुरमीत सिंग हसू लागले होते. मग मी त्यांना सांगितलं की ही जी भूमिका आहे त्याला माहित नाही की मुलीला काय अपेक्षीत आहे.' 

4/7

इंटीमेसी कॉर्डिनेटर

विजय वर्मानं सांगितलं की 'जेव्हा तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरु होतं तेव्हा सेटवर इंटीमेसी कॉर्डिनेटर देखील उपस्थित होते. तर इंटिमेसी कॉर्डिनेटक असल्यानं शूटच्या वेळी एक प्रोटेक्टेड वातावरण तयार होतं.' 

5/7

सेटवर कधी सोप्या पद्धतीनं सीन करता येतात

विजयनं पुढे सांगितलं की 'जर तुम्ही इंटीमेसी कार्डिनेशन वर्कशॉपमधून शिकता. तर तुम्ही सेटवर ते चांगल्या पद्धतीनं दाखवू शकतात.' 

6/7

इंटीमेट सीन्सचं शूटिंग

विजय याविषयी बोलताना म्हणाला, 'हे कोणत्याही दुसऱ्या मूव्हमेंट किंवा मग टचवर अवलंबून असलेली एक एक्सरसाइजसारखी आहे. डान्स आणि अॅक्शन सीक्वेंसप्रमाणेच सेक्शुअल सीन्स असतात. या तिघांची तयारी करणं गरजेचं असतं.' 

7/7

कोरियोग्राफीच्या स्ट्रक्चर

तुम्हाला सांगण्यात येतं की 'तुमचा एक सेफ झोन आहे आणि तुम्ही काय करु शकत नाही. या सीन्समध्ये तुम्ही तुमच्या फीलिंग्सनुसार रिएक्ट करत नाही. तर कोरियोग्राफीच्या स्ट्रक्चरला फॉलो करतात.'