Red Alert! संपूर्ण आभाळ लालबुंद झालं अन् चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका; नेमकं घडलं काय?

Viral News : काही भागांमध्ये मात्र हाच निसर्ग त्याच्या रौद्र रुपानं धडकीही भरवतो. सध्या याच परिस्थितीशी साधर्म्य साधणारी एक घटना घडली आणि संपूर्ण जगाच्या नजरा वळल्या.   

Nov 08, 2023, 08:49 AM IST

Viral News : निसर्ग प्रत्येक वेगळी आपल्याला अवाक् करतो. त्याची बहुविध रुपं आजवर अनेकांनी पाहिली असतील. कुठं हा निसर्ग त्याची मुक्तहस्तानं झालेली उधळण दाखवतो. 

1/8

धडकी भरली ना?

Viral Photos Northern Lights Turn Skies Red Across Europe Bulgaria

तुम्ही आभाळाच्या विविध छटा पाहिल्या असतील. निळंशार आभाळ, ते गुलाबी आणि केशरी रंगाचं आभाळही तुम्ही पाहिलं असेल. पण, कधी लालबुंद रंगाचं आभाळ पाहिलंय? विचारानंच धडकी भरली ना? 

2/8

लालबुंद रंग

Viral Photos Northern Lights Turn Skies Red Across Europe Bulgaria

युरोपसह रशिया, युक्रेन, सायबेरिया, बल्गेरियामध्ये नुकतंच आभाळातच नॉर्थर्न लाईट्स अर्थात aurora borealis पाहिल्या गेल्या. एरव्ही मोरपंखी आणि हिरवी छटा असणारा हा प्रकाश यावेळी मात्र लालबुंद रंगात दिसला. 

3/8

रेड अलर्ट

Viral Photos Northern Lights Turn Skies Red Across Europe Bulgaria

दिवस पुढे सरला आणि रात्रीची वेळ जवळ आली तसतसं आभाळानं वेगळेच रंग दाखवण्यास सुरुवात केली. हे सारंकाही इतकं अनपेक्षित होतं की नागरिकांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. तर, काहींना निसर्गाचा हा Red Alert पाहून एका क्षणासाठी धडकीच भरली.   

4/8

फोटो व्हायरल

Viral Photos Northern Lights Turn Skies Red Across Europe Bulgaria

सोशल मीडियावर अनेकांनीच या लालबुंद आभाळाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली. खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अनेक संस्थांनीही या घटनेची दखल घेतली. 

5/8

अद्वितीय क्षणाचा अनुभव

Viral Photos Northern Lights Turn Skies Red Across Europe Bulgaria

रोमानिया, चेक रिपब्लिक, हंगेरी इथंही याच रंगाचं आभाळ पाहायला मिळालं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामध्ये इथं आलेल्या पर्यटकांनाही एका अद्वितीय क्षणाचा अनुभव घेता आला.   

6/8

भारतात पाहायलाच मिळत नाही

Viral Photos Northern Lights Turn Skies Red Across Europe Bulgaria

नॉर्थर्न लाईट्स हा प्रकार सहसा भारतात पाहायलाच मिळत नाही. पण, 2023 च्याच सुरुवातीला ही कसरही भरून निघाली होती. 

7/8

नॉर्थर्न लाईट्स

Viral Photos Northern Lights Turn Skies Red Across Europe Bulgaria

लडाखमध्ये अशाच काहीशा रंगाच्या छटांनी आभाळ व्यापल्यामुळं भारतातही चक्क नॉर्थर्न लाईट्सचा अनुभव अनेकांनी घेतला होता. पण, हे लालबुंद आभाळ मात्र शब्दांच्याही पलिकडलं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

8/8

फोटो सौजन्य

Viral Photos Northern Lights Turn Skies Red Across Europe Bulgaria

(सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)