Square Wheel Bicycle: आरारारार...खतरनाक! चौकोनी चाकांची सायकल पाहिली का? तुमचंही डोकं चक्रावेल

मानवाची उत्क्रांती झाल्यानंतर पहिली क्रांती जी झाली ती गोलाकार चाकांची. चाकांमुळे मनुष्याच्या प्रगतीला वाव मिळाला. कामं अधिक सोपी होऊ लागली. हळूहळू घोडागाड्यांचा शोध लागला. त्यानंतर बैलगाडी, सायकल, दुचाकी आणि आता कार, असा हा प्रवास वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाचा राहिलाय. मात्र, तुम्हाला सांगितलं की चौकोनी आकारांच्या चाकाची सायकल देखील असते, तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

Apr 17, 2023, 21:37 PM IST

Square Wheel Bicycle : मानवाची उत्क्रांती झाल्यानंतर पहिली क्रांती जी झाली ती गोलाकार चाकांची. चाकांमुळे मनुष्याच्या प्रगतीला वाव मिळाला. कामं अधिक सोपी होऊ लागली. हळूहळू घोडागाड्यांचा शोध लागला. त्यानंतर बैलगाडी, सायकल, दुचाकी आणि आता कार, असा हा प्रवास वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाचा राहिलाय. मात्र, तुम्हाला सांगितलं की चौकोनी आकारांच्या चाकाची सायकल देखील असते, तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

1/5

होय, तुम्ही पाहताच ते खरं आहे. इंटरनेटच्या जगात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस सायकल चालवत आहे. गोलाकार चाकांची नव्हे, तर चौकोनी चाकांची. सायकलची चाके गोल ऐवजी चौकोनी आहेत.

2/5

चाक चौकोनी असेल तर सायकल कशी फिरणार? साहजिकच हा प्रश्न तुमच्याही मनात येत असावा. काही फोटो पाहून तुमचंही डोकं नक्कीच चक्रावलं असेल.

3/5

व्हायरल होत असलेल्या या विचित्र सायकलची चाके फिरत नाहीत. या सायकलच्या चाकांवर एक खास पद्धतीचं रबर बसवलं आहे. 

4/5

जेव्हा रायडर पेडलला मारतो तेव्हा चाकावर लावलेलं रबर फिरतं आणि त्यामुळे सायकल फिरते. सध्याच्या या सायकल परिवर्तनाने सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्यचकित केलं आहे. How The Q created a bike with fully working square wheels (capable of making turns) [full video: https://t.co/wWdmmzRQY3]pic.twitter.com/bTIWpYvbG1 — Massimo (@Rainmaker1973) April 11, 2023

5/5

सायकलमधील स्क्वेअर व्हील सोडले तर त्याचे बाकीचे हँडल, पेडल इत्यादी भाग सामान्य सायकलप्रमाणेच काम करत आहेत. व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 41.8k लाईक्स मिळाले आहेत. त्यामुळे याची जोरदार चर्चा होताना दिसते.