Virat Kohli: विराट कोहली मोडणार सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा रेकॉर्ड; नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याकडे लक्ष

 12 नोव्हेंबर रोजी बंगळुरु येथे भारत आणि नेदरलँड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात विराट कोहली मोडणार सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा रेकॉर्ड का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Nov 11, 2023, 21:05 PM IST

Virat Kohli 50th ODI Century:  वर्ल्डकपचा थरार अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. भारताने आपलं सेमीफायनलच तिकीट फिक्स केलेलं आहे. देशात दिवाळीची धुम सुरु असतानाचा विराट कोहली आपल्या चाहत्यांना दिवाळीचे गिफ्ट देणार आहे. लिग्सस्टेमधील शेवटचा सामना  भारत आणि नेदरलँड या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. 

1/7

विराट कोहली वनडे सामन्यात आणखी एक शतक करताच , जगातील पहिला असा फलंदाज बनेल ज्याने वन-डे सामन्यांत 50 शकत ठोकली आहेत. त्याचा हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडू शकतो. 

2/7

नेदरलँड ही कमजोर टीम आहे. तर विराट कोहलीही चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यामुळे विराट आणखी एक शतक ठोकून सचिनचा विक्रम मोडीत काढणार का ? हे पाहण रंजक ठरणार आहे.

3/7

 या शकताच्या मदतीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकर याचा वनडे सामन्यातील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता विराट कोहलीला सचिनचा विक्रम मोडीत काढण्यासाठी केवळ एका शकताची गरज आहे.  

4/7

विराट कोहलीने साउथ आफ्रिका विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याच्या आंतरराष्ट्रीय वन-डे कारकिर्दीतील 49 वे शकत ठोकले आहे.

5/7

विराट कोहलीने पहिल्यांदाच वन-डे वर्ल्डकपमध्ये 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

6/7

भारतीय संघाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी कमालीची कामगिरी बजावली आहे. विराट कोहलीला तर या वर्ल्डकपमध्ये एक वेगळाच लय प्राप्त झालेला दिसून येतोय.

7/7

भारतीय संघाने सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये उकृष्ट प्रदर्शन केलेलं आहे. भारतीय संघ सलग 8 सामने जिंकून गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानी आहे.